#SaathChal संत तुकाराम महाराज पालखी रथाला झळाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

देहू - देहूतील देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील चांदीचा महिरप आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांचे आकर्षण असलेला चांदीचा रथ, पालखी, अब्दागिरी, गरुडटक्के, माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना पुण्यातील रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सकडून झळाळी देण्यात आली. यासाठी रांका ज्वेलर्सचे ३० कर्मचारी यात सहभागी झाले होते. 

संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात विठ्ठल-रुक्‍मिणी स्वयंभू मूर्ती आहे. तसेच पालखी सोहळ्यात आवश्‍यक असलेले पूजेचे ताट, साहित्य, पालखी, अब्दागिरी, गरुडटक्के, माउलींच्या पादुका, संत तुकाराम महाराजांच्या पादुका, चांदीचा पाट, दानपेटी  यांना चकाकी (पॉलिश) करण्यात आली. पारंपरिक पद्धतीचा वापर करून ही चकाकी देण्यात आली. त्यात रिठा, लिंबू, चिंच पावडर वापरण्यात आली. रांका ज्वेलर्स गेले बारा वर्षे ही सेवा देत आहेत.

Web Title: #SaathChal Pandharichi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi rath