पालखी मार्गावर दहा ट्रॅक्टर कचरा संकलन

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

आळंदी रस्त्ता पालखी मार्गावरील विश्रांतवाडी चौक ते संगमवाडी पुलापर्यंतच्या मार्गाची स्वच्छता करण्याचे काम स्वर्गीय कांतीलाल लुंकड फौंडेशनकडून गेले दोन दिवसांपासून सुरू आहे. दोन दिवसात दहा ट्रॅक्टर कचरा संकलन करण्यात आले आहे. हे स्वच्छता अभियान पुढील दोन दिवस सुरू राहाणार आहे. 

वडगाव शेरी (पुणे) - आळंदी रस्त्ता पालखी मार्गावरील विश्रांतवाडी चौक ते संगमवाडी पुलापर्यंतच्या मार्गाची स्वच्छता करण्याचे काम स्वर्गीय कांतीलाल लुंकड फौंडेशनकडून गेले दोन दिवसांपासून सुरू आहे. दोन दिवसात दहा ट्रॅक्टर कचरा संकलन करण्यात आले आहे. हे स्वच्छता अभियान पुढील दोन दिवस सुरू राहाणार आहे. 

स्वर्गीय कांतीलाल लुंकड फौंडेशन आणि लुंकड रियालीटी संस्थेचे पंधरा कर्मचारी, एक ट्रॅक्टर या अभियातनात सहभागी झाले असून पालिकेचे उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे, सहाय्यक उद्यान अधिक्षक गुरू स्वामी, लुंकड रियालीटीचे राहुल दागलीया यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता निकाळजे आणि रहिम मुल्ला यांच्या देखरेखीखाली हे स्वच्छता अभियान सुरू आहे.

पालखी मार्गावरील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे, दुभाजकातील पालापाचोळा काढणे, गवत काढणे, रस्त्याच्या बाजुचा राडारोडा आणि कचरा उचलणे, दुभाजकांतील झुडपांची छाटणी ही कामे स्वच्छता अभियातान करण्यात येत आहेत, अशी माहिती दत्ता निकाळजे यांनी दिली.

Web Title: #SaathChal Ten tractor garbage collection on Palkhi road