#SaathChal पालख्यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

पुणे - टाळमृदंगाचा गजर, मुखी हरिपाठ अन्‌ ज्ञानोबा तुकोबारायांचा जयघोष, दिवसभर भजन, कीर्तन आणि रात्रीचा जागर करीत भक्तिभावाने संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुकांचे पुण्यनगरीतील भाविकांनी रविवारी दर्शन घेतले. उद्या (ता. ६) देखील दोन्ही पालख्यांचा पुण्यनगरीत मुक्काम आहे. 

आषाढ कृष्ण सप्तमीला अर्थात शनिवारी (ता. ४) संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी पुण्यनगरीत पालखी विठ्ठल मंदिर (भवानी पेठ) येथे सायंकाळी पाच वाजता आली, तर आषाढ कृष्ण अष्टमीला अर्थात रविवारी (ता. ५) विठ्ठल मंदिर मराठा मंडळ ट्रस्ट (नवी पेठ) येथे संत तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी आली. मंगळवारी (ता. ७) सकाळी सात वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी श्रीक्षेत्र देहूकडे, तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी श्रीक्षेत्र आळंदीकडे सकाळी दहा वाजता मार्गस्थ होईल. पालख्यांच्या दर्शनासाठी दोन्ही मंदिरांत सकाळपासूनच भाविक येत होते. सकाळी पादुकांवर अभिषेक, दुपारी नैवेद्य झाल्यावर भजन, कीर्तन, सायंकाळी पुन्हा भजन-कीर्तन आणि रात्रीचा जागर भाविकांना उद्या (ता. ६) सोमवारी रात्रीही अनुभवता येणार आहे. पालख्यांची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आली आहे. सेवाभावी संस्थांतर्फे भोजनव्यवस्था करण्यात आली होती. पालखी विठ्ठल मंदिराचे विश्‍वस्त गोरखनाथ भिकुले म्हणाले, ‘‘पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी तिथीप्रमाणे येतात. यंदा मंदिरात दोन दिवस संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे.भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल.’’

Web Title: #SaathChal Wari Palkhi Sant Dnyaneshwar Sant Tukaram