#SaathChal तुकोबांची पालखी दौंडमध्ये दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज दुपारी चारच्या सुमारास दौंड तालुक्‍यात प्रवेश केला. बोरीभडक येथे खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, प्रांताधिकारी संजय असवले यांच्यासह तालुक्‍यातील शासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 

यवत - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज दुपारी चारच्या सुमारास दौंड तालुक्‍यात प्रवेश केला. बोरीभडक येथे खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, प्रांताधिकारी संजय असवले यांच्यासह तालुक्‍यातील शासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मुक्कामानंतर पालखी सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी उरुळी कांचन येथे काही काळ थांबला. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास या सोहळ्याने बोरीभडक गावच्या हद्दीतून दौंड तालुक्‍यात प्रवेश केला. सालाबादप्रमाणे या वर्षीही बोरीभडकच्या ग्रामस्थांसोबत तालुक्‍यातील राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी येथे स्वागतासाठी उपस्थित होते. प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार बालाजी सोमवंशी, गटविकास अधिकारी गणेश मोरे, हवेलीचे तहसीलदार डॉ. सुनील शेळके, महिला बाल कल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समितीचे उपसभापती सुशांत दरेकर, नितीन दोरगे, माजी अध्यक्षा वैशाली आबणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पोपट ताकवणे, बाळासाहेब पवार, महादेव यादव, बोरीभडकचे सरपंच बाबूराव गजशिव उपस्थित होते. 

तालुक्‍याच्या सीमेवरील स्वागतानंतर सोहळा यवत मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. पालखीमार्गामध्ये म्हेत्रे पॅकेजिंग, हॉटेल शेरू, कासुर्डी ग्रामस्थ यांनी चहापानाची सुविधा केली होती. यवत येथे बालाजी ग्रुपच्या वतीने चहावाटप, तर लडकतवाडी ग्रामस्थ व प्राथमिक शाळेच्या वतीने केळी व पाणीवाटप करण्यात आले. यवत येथे वारकऱ्यांच्या सायंकाळच्या जेवणासाठी झुणका- भाकरी करण्याची जुनी परंपरा आहे. त्यासाठी लाखो भाकरी व त्यास लागणारे बेसन बनविण्याची लगबग आज दिवसभर येथील काळभैरवनाथ मंदिराच्या भटारखान्यात सुरू होती, असे सुरेश शेळके, नानासाहेब दोरगे, सदानंद दोरगे, कुंडलिक खुटवड यांनी ग्रामस्थांच्या वतीने सांगितले.

Web Title: #SaathChal Wari Palkhi sant tukaram maharaj palkhi daund