#SaathChal तुकोबांच्या पालखीचे वडापुरी येथे स्वागत

वडापुरी (ता. इंदापूर) - तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करताना माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह ग्रामस्थ.
वडापुरी (ता. इंदापूर) - तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करताना माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह ग्रामस्थ.

वडापुरी - येथील ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराज पालखीचे फटाक्‍यांच्या आतषबाजीत व येथील भजनी मंडळांनी गुलाब फुलांची उधळून करून टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत केले. 

इंदापूर येथील सोमवारच्या मुक्कामानंतर सकाळी १० वाजता पालखी सोहळा वडापुरी येथे आला. या वेळी पालखीच्या स्वागताला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, तहसीलदार श्रीकांत पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, भरत शहा, राजेंद्र कोरटकर, डॉ. लक्ष्मण आसबे, केशव बोराटे, प्रीतमकुमार देवकर पाटील, सरपंच योगिता काळे, उपसरपंच महेश देशमुख, दादासाहेब जगताप, भागवत काटकर, हरिदास काटकर, बापू चंदनशिवे, संतोष देशमुख, ग्रामविकास अधिकारी एस. टी. भोरे, दत्तात्रेय शिर्के, महेश देवकर, शरद कामठे, नारायण पवार आदी उपस्थित होते. वडापुरी येथील श्रीनाथ मंदिराच्या प्रांगणात पालखी दर्शनासाठी एक तास ठेवण्यात आली होती. या वेळी पालखीच्या दर्शनासाठी विठ्ठलवाडी, काटी, रेडा, रेडणी, अवसरी, बाभूळगाव, वरकुटे खुर्द परिसरातील भाविक दर्शनासाठी आले होते. त्यामुळे हा परिसर भक्तिमय झाला होता. दर्शनानंतर सकाळी अकरा वाजता पालखी बावड्याकडे मार्गस्थ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com