#SaathChal घेऊनि आलो आस वारीच्या अनुभूतीची

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या पालखी सोहळ्याची एवढी मोहिनी का आहे? हजारो लोक आळंदी ते पंढरपूर हा मार्ग कसा पार करतात, याची उत्सुकता होती. पण त्याची अनुभूती घेण्यासाठी यंदा आम्हीही विठुरायाच्या भेटीला निघालो आहोत... सांगत होते, बुलडाणा जिल्ह्यातील विशीतील तीन युवक.

रवी कुलाळ, सचिन देवकर आणि शंकर देवकर हे बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्‍यातील भाजीसपूर गावातून यंदा प्रथमच आळंदी ते पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. ‘‘वारी म्हणजे काय? वारीत घडते तरी काय? हे जाणून घेण्यासाठी मी वारीत आलो आहे,’’ असे शंकर सांगत होता. या वेळी सचिन म्हणाला, ‘‘वारीविषयी खूप ऐकल्याने इथे येण्याची उत्सुकता होती. वारीचा प्रवास, भजन आणि रिंगण पाहण्याची इच्छा आहे. माझे आई-वडील दिंडीत येत होते. त्यांचा वारसा मला पुढे चालवायचा आहे.’’ वारीतील दोन दिवसांच्या अनुभवाने तिघेही हरखून गेले होते. सोहळ्यातील वातावरण, भक्तिभाव आमची पावले आपसूकच पंढरपूरपर्यंत नेतो अन्‌ विठूराय पाठीशी आहेच, असे म्हणत हे तिघे वारकऱ्यांसोबत मार्गस्थ झाले.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Shankar Devkar Ravi Kulal Sachin Devkar