#SaathChal मेकॅनिकल इंजिनिअर जोपासतोय वारीचा वारसा

पीतांबर लोहार
गुरुवार, 5 जुलै 2018

पिंपरी - ‘रामकृष्णहरी’ अशा शब्दांत डोक्‍यावर पांढरी टोपी, कपाळी बुक्का आणि गळ्यात तुळशी माळ घातलेल्या रोहितने स्वागत केले. बैठकीच्या खोलीत भिंतीवर विठ्ठल आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे फोटो लावलेले होते. सोफ्यावर बसलेले आजी-आजोबा दोघेही माळकरी. मोशी येथील ७८ वर्षांच्या सोपान बोराटे यांचा नातू रोहित मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याच्या रूपाने बोराटे कुटुंबातील सातवी पिढी आषाढी वारीला जात आहे. 

गेली सलग दहा वर्षे वारीला जाणारा रोहित सध्या कीर्तनही शिकत 
आहेत. 

ते म्हणाले, ‘‘उच्च शिक्षण घेतले म्हणून घरातील विधायक परंपरा विसरून कसे चालेल. मला कळू लागलं तेव्हा आजोबा वारीला जायचे. त्यानंतर वडील आणि आता मी वारीत चालतो आहे. आई-वडिलांच्या सेवेविषयी संत ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायात म्हणतात, ‘सकल तीर्थांचियें धुरें। जियें का मातापितरें। तया सेवशी कीर शरीरें। लोन किजे।।’ सर्व संतांनीही 
हाच विचार सांगितला आहे. मात्र, त्याचा आपल्याला विसर पडत आहे.’’

सोपान बोराटे म्हणाले, ‘‘आम्ही मूळ शिखर शिंगणापूरचे. आमचे पणजोबा कामानिमित्त मोशीत आले आणि इथेच स्थायिक झाले. ते महादेवाची कावड घेऊन शिखर शिंगणापूरला जायचे. तेथून पंढरपूरला जायचे आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत यायचे. तेव्हापासून आमच्या घराण्यात वारीची परंपरा सुरू झाली. मी पंचविसाव्या वर्षी पहिल्यांदा वारीला गेला होतो. ती परंपरा नातवाने चालू ठेवली आहे, हे आमचे भाग्य.’’

चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. त्यामुळे संत विचारांचे नेहमी आचरण करायला हवे. आई-वडील हेच दैवत मानून त्यांची सेवा करायला हवी. सर्व संतांनी हाच विचार आपल्याला दिला आहे. त्यांच्या प्रभावामुळेच माणूस वाईट विचारांपासून परावृत्त होतो. 
- रोहित बोराटे, मेकॅनिकल इंजिनिअर, मोशी

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 mechnical Engineer Rohit Borate