#SaathChal पुंडलिकाचा वसा घेणाऱ्यांना ‘माउलीं’चीही ‘साथ’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

आळंदी - सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्सच्या वतीने यंदा आषाढी वारीत ‘वारी विठुरायाची आणि आई- वडिलांच्या सेवेची’ ही संकल्पना घेऊन ‘साथ चल’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भाविकांनी वारीत सहभागी होऊन आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमात संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आणि मानकरी सहभागी होणार आहे.

आळंदी - सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्सच्या वतीने यंदा आषाढी वारीत ‘वारी विठुरायाची आणि आई- वडिलांच्या सेवेची’ ही संकल्पना घेऊन ‘साथ चल’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भाविकांनी वारीत सहभागी होऊन आई-वडिलांच्या स्वास्थ्यासाठी दोन पावले चालावीत, त्यांच्या निरोगी आयुष्याकडे लक्ष द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे. या उपक्रमात संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती आणि मानकरी सहभागी होणार आहे.

‘साथ चल’ हा सकाळचा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या गाभ्याला भिडणारा आहे. वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान असलेला पांडुरंग हा मातृ-पितृ भक्त असलेल्या पुंडलिकासाठी तिष्ठत उभा आहे. आई वडिलांची सेवा करणाऱ्या सात्त्विक मुलासाठी देवाचा अवतार आहे. हा आदर्श असलेल्या भक्तांचा संदेश ‘सकाळ’ वारीतून देत आहे.
- अभय टिळक, प्रमुख विश्‍वस्त, आळंदी देवस्थान

सध्या घरांमध्ये हौसेसाठी प्राणी पाळले जातात. मात्र, आई-वडिलांना सांभाळणे मुलांना जड वाटते. आई वडिलांच्याच सेवेत खरे सुख आहे. आई-वडिलांची सेवा जो प्रामाणिकपणे करेल, तोच समाजाची सेवा करू शकतो. आज आई-वडिलांचा सांभाळ करीत नाही म्हणून न्यायालयात खटल्यांची संख्या वाढते. याबाबत प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. समाजप्रबोधनासाठी ‘सकाळ’ने केलेला हा उपक्रम लोकचळवळ व्हावी, ही अपेक्षा.
- ॲड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख, आळंदी देवस्थान

‘सकाळ’ने सुरू केलेला उत्तम उपक्रम आहे. आई-वडिलांविषयी समाजामध्ये योग्य संदेश जावा आणि तरुणांमध्ये सेवेचा विचार रुजावा, यासाठी वारीच्या माध्यमातून ‘सकाळ’ने योग्य रीतीने विषय हाताळला आहे. समाजात आज हा प्रश्‍न सतावत आहे, त्याला वाचा फोडण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. त्यानिमित्ताने प्रत्येकात आई-वडिलांबद्दल प्रेमभावना जागृत केली जाईल. तेच या उपक्रमाचे यश असेल. 
- राजाभाऊ चोपदार, मानकरी, आळंदी देवस्थान

‘सकाळ’ने सुरू केलेल्या ‘साथ चल’ उपक्रमामुळे आई-वडिलांच्या सेवेची जाणीव मुलांमध्ये तयार होईल. आई-वडील हेच खरे दैवत आहेत, हाच संदेश संतांनी दिला. तोच या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वदूर जाईल आणि लोक आईवडिलांबद्दल कृतज्ञ राहतील.
- बाळासाहेब आरफळकर, पालखी सोहळा मालक

‘सकाळ’ने आषाढी वारीत सुरू केलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. यातून समाजाला संस्काराची योग्य दिशाही मिळेल. संतांनी आई वडिलांनाच देव मानले आहे. त्यामुळे वारीच्या वाटेने जाताना संतांच्या शिकवणीतून आई वडिलांमध्ये प्रेमाची, आदराची भावना निश्‍चित निर्माण होईल. 
- बाळासाहेब चोपदार, मानकरी, आळंदी देवस्थान

सध्याच्या काळात मुलगा आणि वडील यांच्यातील नाते दुरावत चालले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कौटुंबिक एकोपा ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रबोधनाची गरज होती. ती ओळखून ‘सकाळ’ने केलेला हा उपक्रम अतिशय उत्तम आणि आदर्शवत आहे.
- योगेश देसाई, विश्‍वस्त, आळंदी देवस्थान

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Sant Dnyaneshwar Maharaj