#SaathChal आषाढी वारीसाठी अलंकापुरी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान वारीत हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून वारकऱ्यांचे आगमन सुरू झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी अलंकापुरी सज्ज झाली आहे. 

पालखी सोहळा आळंदीतून ६ जुलैला पंढरीकडे प्रस्थान ठेवेल. ठिकठिकाणी तंबू आणि धर्मशाळांमधून वारकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे. धर्मशाळांमध्ये ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम सुरू आहेत. माऊली मंदिरात दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी दर्शनाची रांग भक्ती सोपान पूल ओलांडून नदीपलीकडे गेली होती.  

पोलिसांचा बंदोबस्त रुजू झाला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे आणि आळंदीतील सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांनी मंदिर, समाधी गाभारा, पान दरवाजा, दर्शनबारी आणि प्रदक्षिणा रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावला. याचबरोबर भाविकांना सूचना देण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्पीकर आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. प्रदक्षिणा रस्त्यावर साइडपट्ट्यांची कामे न झाल्याने चिखल झाला होता. प्रदक्षिणा मार्गावर तसेच नवीन पुलावर, देहूकर फडासमोर रस्त्यावर खड्डे असल्याने पावसामुळे पाणी साचून राहिले होते. दुसरीकडे पालिकेच्या वतीने स्वच्छतेची कामे वेगात सुरू आहे.

ठिकठिकाणी शौचालयांची दुरुस्ती, सफाईबरोबर जंतुनाशक पावडर मारण्याचे काम सुरू करण्यात आले. विभागवार चोवीस तास पाणीपुरवठा सध्या सुरू आहे, तर भाविकांसाठी उद्यापासून पहाटेच्यावेळी टॅंकरने पाणी पुरविण्यात 
येणार आहे.

अधिकाऱ्यांकडून आढावा
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक सुवेझ हक, प्रांताधिकारी आयुष प्रसाद, पोलिस उपविभागीय अधिकारी राम पठारे, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी आळंदी आणि मंदिरातील बंदोबस्ताबरोबर सोयीसुविधांची पाहणी बुधवारी केली. या वेळी शहरातील विविध कामांचा आढावाही घेतला.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Sant Dnyaneshwar Maharaj Alandi