#SaathChal इंदापुरात वारकऱ्यांची नेत्रतपासणी

इंदापूर - कर्मयोगी कारखान्यातर्फे रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले. याचा लाभ घेताना वारकरी.
इंदापूर - कर्मयोगी कारखान्यातर्फे रुग्णांना चष्मेवाटप करण्यात आले. याचा लाभ घेताना वारकरी.

इंदापूर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची इंदापूरकरांनी विविध उपक्रमांनी सेवा केली. बिजवडी (ता. इंदापूर) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यातर्फे इंदापूर महाविद्यालयात २ हजार वारकऱ्यांची नेत्रतपासणी करण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, संचालक सुभाष काळे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर, डॉ. तेजस्विनी तोडकर, मेधा वल्हवणकर यांच्या हस्ते एक हजार वारकऱ्यांना या वेळी मोफत चष्मे वाटप केले. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या इंदापूर शाखेतर्फे वारकऱ्यांना नवनाथ शेवाळे यांच्या हस्ते अल्पोपहार देण्यात आला. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांनी बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उदय देशपांडे, किरण गानबोटे, प्रेमकुमार जगताप यांच्या उपस्थितीत शेकडो वैद्यकीय सुविधा दिल्या. डॉ. अक्षय शेळके यांनी अवयवदान याची माहिती दिली. 

युवा क्रांती प्रतिष्ठानतर्फे प्रशांत सिताप, धरमचंद लोढा, आनंद व्यवहारे, बाळासाहेब क्षीरसागर यांनी वारकऱ्यांना आयुर्वेदिक पंचकर्म सेवा पुरवली. पतंजली योग समितीतर्फे दत्तात्रय अनपट, मदन चव्हाण, विठ्ठल गाढवे, सचिन पवार, शेखर पाटील व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांना मसाज करून त्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. श्री नरसिंह प्रासादिक गणेशोत्सव मंडळाने वारकऱ्यांना चहावाटप केले. गणेशोत्सव मंडळे, रोटरी व लायन्स क्‍लब, इतर स्वयंसेवी संस्थांनी वारकऱ्यांना चहा, अन्न, धान्य वाटप केले. नंदकुमार गुजर, नरेंद्र गांधी, प्रमोद भंडारी, मनोहर बेद्रे व फिनोलेक्‍स कंपनीतर्फे अल्पोपहार देण्यात आला. सहेली महिला बचत गटातर्फे टॉऊन हॉलमध्ये वारकऱ्यांची सेवा केली. पालखी निर्मलवारी प्रमुख किरण ढमढेरे, तालुका प्रमुख गोरख माने, शहर प्रमुख चांदभाई पठाण, मुन्ना बागवान यांनी शहरात दहा ठिकाणी नगर परिषद सहकार्याने ५०० टॉयलेटच्या माध्यमातून निर्मलवारी यशस्वी केली. पोलिस, होमगार्डस तसेच दोन दिंडीतील वारकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, सुरेश लोखंडे, मारुती कन्हेरे, पोपट साखरे यांनी भोजन दिले. संभाजी, जागृती, शिवाजी मित्र मंडळातर्फे वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com