#SaathChal ज्येष्ठ वारकऱ्यांना दिली तनिष्कांनी अनोखी भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे - राज्यभरातून वारीत सहभागी झालेल्या ज्येष्ठ विठ्ठलभक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत पुण्यातील तनिष्कांनी सोमवारी ‘साथ चल’ मोहिमेत सहभाग नोंदवला. 

‘माता विठ्ठल पिता विठ्ठल’ हा भाव मनी बाळगत ज्येष्ठ वारकऱ्यांच्या चरणी तनिष्का नतमस्तक झाल्या. याचबरोबर पर्यावरण संस्कृती जोपासत स्वतः बनवलेल्या सुमारे सात हजारांपेक्षा जास्त कापडी पिशव्या तनिष्कांनी वारकऱ्यांना भेट दिल्या. संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोमवारी पुण्यातून मार्गस्थ झाल्या. 

रिमझिमत्या पावसात ‘ज्ञानोबा-तुकारामा’चा जयघोष करीत जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांच्या हातात तनिष्कांनी रंगीबेरंगी, आकर्षक अशा कापडी पिशव्या दिल्या. तेव्हा काही मिनिटात अवघ्या दिंडीला कापडी पिशव्यांचे वाटप झाले. प्रत्येकाच्या हातात आकर्षक, रंगीत कापडी पिशव्या दिसू लागल्या. या उपक्रमासाठी माहेश्‍वरी प्रगती मंडळाचे शिवा मंत्री, सुनील बिहाणी, अनिल बिहाणी आणि नगरसेवक विशाल तांबे यांचे सहकार्य लाभले.  

गेले आठ, दहा दिवस तनिष्कांची कापडी पिशव्या शिवण्याची लगबग सुरू होती. सगळ्या पिशव्या एकसारख्या दिसाव्यात यासाठी पुण्यातील तनिष्का सदस्यांनी एकत्र येऊन, बैठक घेऊन नियोजन केले. बघता बघता तनिष्कांनी स्वतःच्या, त्यांच्या गटातून शेकडो साड्या जमवल्या. कित्येकींनी नव्या कोऱ्या साड्या दिल्या. वारी पुण्यात प्रवेश करण्यापूर्वी दोन दिवस आधीच पिशव्यांचे गठ्ठे ‘सकाळ’ कार्यालयात पोचले होते. वडगाव शेरी, कोथरूड, कोंढवा, सुखसागर नगर, येरवडा, नवसह्याद्री, वारजे, पौड रस्ता, धनकवडी, कात्रज, दत्तनगर, मध्यवर्ती भागातील पेठा, रांजणगाव आदी ठिकाणांहून तनिष्कांनी कापडी पिशव्या भेट दिल्या.

Web Title: #SaathChal Wari Palkhi Varkari Tanishka Gift