#SaathChal पालखीच्या मार्गावर झाड लावण्याचा वारकऱ्यांचा वसा 

सचिन शिंदे
रविवार, 15 जुलै 2018

वीस लाख बिया पंढरपूरपर्यंतच्या वाटेवर वारकरी टाकणार आहेत. हाच त्यांचा निर्धार झाड लावणाच्या परंपरेला साक्ष देणारा आहे. बारामती येथील नेचर फेन्ड्रस आॅर्गनायझेशनची त्यांना साथ मिळत आहे. 

सणसर - वृक्षवल्ली आम्हा सोयरी... संत तुकाराम महाराज यांनी याच अभंगात पर्यावरण रक्षण अधोरेखीत केले. ती परंपरा वारकरी रूजवत आहेत. बारामतीहून निघालोल्या संत तुकाराम महाराज पालखीचे परंपरेनुसार काटेवाडीत धोतराच्या पायघड्यांनी स्वागत झाले. मेंढ्याचे रिंगणही पार पडले. त्याच पद्धतीने झाड लावण्याचीही परंपरा वरकऱ्यांनी मनापासून स्विकरली आहे. वीस लाख बिया पंढरपूरपर्यंतच्या वाटेवर वारकरी टाकणार आहेत. हाच त्यांचा निर्धार झाड लावणाच्या परंपरेला साक्ष देणारा आहे. बारामती येथील नेचर फेन्ड्रस आॅर्गनायझेशनची त्यांना साथ मिळत आहे. 

बारामतीचा शाही मुक्काम आटोपून पालखी सोहळा सणसरकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी सोहळा काटेवाडीच्या हद्दीत पोचला. प्रवेशव्दारावर परीट समाजातर्फे धोतराच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत झाले. तासभर विसावलेला सोहळा आतील मार्गाने बस स्थानकाकडून बाहेर पडला. तेथे मेंढ्याचे रिंगण पार पडलले. मेंढ्याचे रिंगण व धोतराच्या पायघड्या या परंपरा परोपरिने जपल्या गेल्या आहेत. त्याबरोबरच वृक्षसंवर्धन व लागवडीची मोठी परंपरा वारकरी जपाताहेत हेही त्याचवेळी अधोरेखीत झाले. सोहळा काटेवाडीत पोचला त्यावेळी वीस एक जणांचा गट हातात बाॅक्स घेवून वारकऱ्यांना पुड्या वाटत होता. त्याचवेळी ते झाडे लावा झाडे जगवा असा संदेशही देत होते. अकरा वर्षापासून झाड लावण्यासाठीचे नेचर आॅर्गमायझेशन वारीत जागृती करत आहे. उंडवडी, बारामती, काटेवाडी, पिंपळी, सणसर व भवानीनगरसह पालखीच्या वाटेवरील गावात वीस लाखापेक्षा जास्त बिया वाटप करून पर्यावरण रक्षणाचीच परंपरा जणू रूजवली जात आहे. त्या काहीजण पंढरपूरपर्यंत जातात.

शाळेतील विद्यार्थ्यांसह अनेकांकडून बिया संकलनाचे काम झाले आहे. त्यात वीस लाख बिया जमा केल्या आहेत. त्या पालखी मार्गावर पंढरपूर पर्यंत वाटण्यात येणार आहेत. काटेवाडीत पंढरपूर तालुक्यातील एका दिंडीतील संभाजी सणगर यांनी पन्नास पाकीट मागितली. त्यांनी वारीच्या वाटेवर दोन वर्षापूर्वी बिया टाकल्या होत्या. त्या उगवून आल्याचे संबधितींना सांगितले. सणगर प्रातिनिधिक आहेत. असे अनेक वारकरी त्या ग्रुपला भेट होते. बिया नेत होते. काहींनी आम्ही गावकडे झाड लावल्याचे सांगितले. पालखीच्या वाटेवरील परंपरा जतन करणाऱ्या वारकऱ्यांना नेचर संघटनेद्वारे वीस लाख बीयांचे वाटल्या आहेत. त्यामुळे पढरपूरपर्यंत मोकळ्या वाटेत, रानात त्या बिया वारकऱ्यांनी टाकायच्या आहेत. त्यामुळे वारकऱ्यांनीही झाड लावण्यची परंपराच जतन करण्याचा जणू वसाच घेतल्याचे जाणवते. धोतराच्या पायघड्या असो अथवा मेंढाचा रिंगण सोहळा या परपंरे बरोबरच झाड लावण्याची परंपराही वारकऱ्यामध्ये रूजत असल्याचे अनेकांशी बोलल्यानंतर जाणवले. बबलू कांबळे त्या ग्रुपचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांनीच ही परंपरा पुढे चालवली. दशकाहून अधिक काळ रूजलेली परंपरा आता वरकऱ्यांनीही स्विकारली आहे, असेच जाणवून गेले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: #SaathChal Warkari plantation on the path Palkhi sansar pune