#SaathChal आईवडिलांसाठी वारीत चालू...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

पिंपरी - आई-वडिलांचा सांभाळ करण्याबाबत युवकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून ‘साथ चल’ हा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात आम्ही निश्‍चित सहभागी होऊ, असा संकल्प युवकांनी केला. निमित्त होते आकुर्डी येथील दत्त मंदिरात आयोजित बैठकीचे.

पिंपरी - आई-वडिलांचा सांभाळ करण्याबाबत युवकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘सकाळ’च्या माध्यमातून ‘साथ चल’ हा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात आम्ही निश्‍चित सहभागी होऊ, असा संकल्प युवकांनी केला. निमित्त होते आकुर्डी येथील दत्त मंदिरात आयोजित बैठकीचे.

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणारा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी शहरात दाखल होत आहे. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. त्यानंतर सोहळा पुण्यात मुक्कामी पोचतो. संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळाही पुण्यात मुक्कामी असतो. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल’ यांच्यातर्फे सहा, सात आणि नऊ जुलै रोजी ‘वारी विठुरायाची अन्‌ आई-वडिलांच्या संगोपनाची’ या संकल्पनेतून ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी आकुर्डीतील दत्तवाडी येथील दत्त मंदिरात बैठक झाली. त्यास नगरसेवक प्रमोद कुटे, जयराम मोरे, दिलीप गोसावी, विष्णुपंत कुटे, विलास शिंदे, गजानन गायकवाड, प्रभाकर कुटे, दत्तात्रेय पाचभाई, विलास लिमसे, देविदास शिरोळे, प्रभाकर वाळुंज, दीपक शिंदे असे १८ वर्षांच्या युवकांपासून ८२ वर्षांच्या आजोबांपर्यंत नागरिक उपस्थित होते. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अविनाश चिलेकर यांनी उपक्रमाची माहिती दिली. त्यास ज्येष्ठांसह तरुणांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

कुटे म्हणाले, ‘‘वृद्धाश्रमांतील संख्या कशी कमी करता येईल. आईवडिलांचा जन्मभर सांभाळ करण्याबाबत युवकांचे प्रबोधन होईल, यासाठी ‘सकाळ’ने चांगली कल्पना मांडली आहे. बहुतांश तरुणांमध्ये स्वार्थीपणाची भावना वाढत आहे. त्यामुळे वृद्धाश्रमात ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. ती कमी करण्यासाठीच नव्हे तर, वृद्धाश्रम ही संकल्पनाच नष्ट करण्यासाठी ‘साथ चल’ उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.’’

ज्येष्ठांचे बोल मोलाचे
८२ वर्षांचे आजोबा जयराम मोरे म्हणाले, ‘‘सध्या पैसा व स्वार्थाला महत्त्व आलेले आहे. युवकांनी आईवडिलांची सेवा करावी, उद्या तुमच्यावरही वृद्ध होण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी आजच सावध व्हा आणि ‘सकाळ’च्या उपक्रमात सहभागी व्हा.’’

Web Title: #SaathChal Youth's awakening to take care of parents