साबीर तांबोळीची ऑस्ट्रेलियात होणाऱया स्पर्धेसाठी निवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

टाकळी हाजी : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील साबीर असलम तांबोळी यांनी पाचव्या विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले. ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या आशिया विद्यार्थी जागतिक ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

गुजरात, गोद्रा येथे पाचवी विद्यार्थी राष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत तिहेरी उडी स्पर्धेकरीता साबीर असलम तांबोळी यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान व्यक्त करावे लागले. द्वितीय क्रमांक पटकावला असला तरी दोन महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या आशिया विद्यार्थी जागतिक ऑलिंपिक तिहेरी उडी स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत त्यांनी आत्तापासून सराव सुरू केला आहे.

अंजूमन इत्तेहाद तंबोलीयान, जमात पुणे ग्रामीण अध्यक्ष अहमदभाई तांबोळी, शिरूर तालुका अध्यक्ष यूनूस तांबोळी, गफूरभाई तांबोळी, ओबीसी संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Sabir Tamboli to be selected in Australias Competition