व्यवसायासाठी परिपूर्ण प्रशिक्षण गरजेचे; सचिन बामगुडे यांचा कानमंत्र

व्यवसायासाठी परिपूर्ण प्रशिक्षण गरजेचे; सचिन बामगुडे यांचा कानमंत्र

पुणे - ‘‘शालेय शिक्षण गावात झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात आलो. घराची परिस्थिती हलाखीची असल्याने एका हॉटेलमध्ये काम सुरू केले. चार वर्षात टेबल पुसण्यापासून ते वेटर, कॅप्टन, कॅशिअर, मॅनेजर अशी कामे केली. हा अनुभव आल्यानंतर कुक असलेल्या एका मित्राला सोबत घेऊन हॉटेल सुरू केले. पण तो कुक सोडून गेल्याने व मला पदार्थ बनवता येत नसल्याने हॉटेल बंद पडले. त्यावेळी मला कळाले की कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याचे पूर्ण ज्ञान, प्रशिक्षण असणे गरजेचे आहे, तरच व्यवसायात यशस्वी होता येते,’’ असा अनुभव सांगत नव्याने व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्यांनी प्रशिक्षण घेऊन परिपूर्ण व्हा’’, असा कानमंत्र एसपी फायनान्स ॲकॅडमी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन बामगुडे यांनी दिला.

सकाळ विद्या आणि एसपी फायनान्स ॲकॅडमी ऑफ इंडियातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केलेल्या सेमिनारमध्ये निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सचिन बामगुडे यांची मुलाखत घेऊन त्यांच्या जीवनातील पैलू उलगडले. या वेळी व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील, अभिनेत्री पूजा सावंत यांनीही मार्गदर्शन केले.  

‘एसपी फायनान्स ॲकॅडमी’च्या स्थापनेचा प्रवास सांगताना सचिन बामगुडे म्हणाले, ‘‘लॉकडाउच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे आपण ज्या फायनान्स क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहोत, तर अशाच प्रकारे इतर लोक का यशस्वी होणार नाहीत, असा विचार केला. त्यानंतर गरजवंतांना मदत करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात ही कंपनी स्थापन केली. त्यासाठी अनुभवी व कष्टाळू सहकाऱ्यांची उत्तम टीम तयार केली.’’ 

लॉकडाउनंतर नवीन कोणता व्यवसाय सुरू करायचा हे लोकांना कळत नाही, अशा लोकांना मदत केली जाईल. त्यांच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी आवश्‍यक गुण असतील, तर लगेच सामावून घेतले जाईल. पण ज्ञान आवश्‍यक असले, तर अशांसाठी सहा महिन्यांचा कोर्स तयार केला आहे. नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी यांना त्यांच्या सोईनुसार बॅच निवडण्याची सुविधा उपलब्ध केली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संकटातूनच माणूस शहाणा बनतो 
प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी जवळपास तासभर मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकटांवर मात केलेल्या प्रसंगांचे दाखले देत आपणही त्याच पद्धतीने काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येकामध्ये क्षमता असते, पण त्याचा वापर कसा करावा हे कळत नाही. संकटे आल्यावरच माणूस शहाणा होतो.  मनातील न्यूनगंड काढून टाका, नकारात्मकता पेरणाऱ्या लोकांपासून दूर व्हा आणि एसपी ॲकॅडमी सारख्या या सकारात्मक लोकांच्या सहवासात या. तुम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल.’’  

स्वावलंबन गरजेचे
पूजा सावंत म्हणाल्या, ‘‘एसपी फायनान्स ॲकॅडमी ऑफ इंडियासोबत गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहे. एकाच मार्गातून पैसा येत असल्याने कोरोनामुळे अनेकांचा उदरनिर्वाह थांबला. पण आपण आता स्वावलंबी होणे  गरजेचे आहे. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्तोत्र असावेत. मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, पण अभ्यास करून छोटा व्यवसाय सुरू करा आणि नंतर तो मोठा करा. त्यासाठी एसपी ॲकॅडमी महत्त्वाची आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com