जिद्द आणि मेहनतीच्या जेरावर सचिन झाला पोलिस उपनिरिक्षक

police-cap
police-cap

टाकवे बुद्रुक - जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक विचारावर टाकवे बुद्रुकचा सचिन कैलास भालेराव हा तरुण आंदर मावळातील पोलीस उपनिरीक्षक झालेला पहिला तरूण ठरला. त्याने स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश संपादन केले. वास्तविक सचिनला युपीएससीची परिक्षा देऊन जिल्हाधिकारी व्हायचे होते. परंतु, या परीक्षेची तयारी करता करता एमपीएससी देऊन तो पोलिसांचा साहेब झाला. परंतु, आजही त्याचे कठीण परिश्रम करतो आहे. 

सचिनचे वडील कैलास भालेराव येथील पोल्ट्री फार्मात नोकरीला आहेत. आंदर मावळातील ही पोल्ट्री पहिली जिथे स्थानिकांना चाळीस वर्षांपूर्वी काम मिळाले. त्याची आई सुभद्रा गृहिणी आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेऊन सचिनने तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयात वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. वाणिज्य शाखेच्या दुस-या वर्षात शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत त्याने निगडे येथील कॅम्प मध्ये २००९ मध्ये सहभाग नोंदवला. तेथे केलेल्या कामाने, कॅम्पमधील यशस्वी सहभागाने त्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळवून दिला. आणि त्याच्या आतील मनाने साद घातली. 

दरम्यान, महाविद्यालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर झाले. यामध्ये प्रा.विश्वनाथ पाटील यांचे व्याख्यान ऐकले. एअर फोर्स मधील कै.शशिकांत शेट्टे आणि प्रा.पाटील यांच्या कडून प्रेरणा मिळाली. आणि एका ध्येयाने खेडयातील हा तरुण पेटून उठला. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच डॉ.प्रविण माने यांच्याशी स्नेह जुळला आणि मग सुरू झाली तयारी स्पर्धा परिक्षची, साधारणपणे २०१० परिक्षांची पासून कैलासने तयारी केली. पण शेतीवाडी नाही, लहान भावंडे आणि एकटे वडील कमवते. त्यामुळे घरची परिस्थिती तशी बेताची, पण वडीलांनी धीर दिला लहान भावांनी आधार दिला आणि आईने काटकसरीने संसाराचा गाडा ओढयला सुरूवात केली. 

कैलासला आवश्यक असणारी वह्या, पुस्तके, प्रवास खर्च, कपडे, खाणेपिणेची जबाबदारी लहानांनी घेतली. कैलास दर दिवस अभ्यासाला टाकवे बुद्रुक येथून वडगावला यायचा, तेथील गोपाळराव नवजीवन संचलित स्व.अशोक शहा अभ्थासिकेत तो अभ्यास करायचा. शेलारवाडीतील काव्या करिअर अकॅडमीत त्याने दीड वर्षे व्यायामाचे धडे गिरविले. कुटूबांत कोणीच दहावीच्या पुढे शिकलेले नाही तरी या बहादूर गडयांने युपीएससीच्या तयारीत उतरला, राज्य सेवा आयोगाच्या परिक्षा त्याने दिल्या पण एक दोन मार्काने त्यात अपयश यायचे पण तो खचून गेला नाही. यशाच्या जवळ जावून आलेल्या अपयशाने अनेक जण मूळ हेतू पासून दूर जातात पण याने मनाचा कल बिघडू दिला नाही. अशा परिस्थितीत डॉ.प्रविण माने यांनी त्याला सावरले. सकारात्मक दृष्टिकोन सतत बळवत ठेवला. त्यामुळे आठ वर्षाच्या परिश्रमातून हे यश त्याला मिळाले. 

प्रविण माने म्हणाले, "मावळ कर्तृत्वाने बहरलेली भूमी आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कर्तृत्व सिद्ध केले. पण त्याच मावळच्या भूमीत अजून एक ही आयएस अधिकारी झाला नाही.मावळच्या प्रत्येक गावागावात जशी मंदीरे, विहार उभी केली जातात तशी दानशूर, धनिक आणि राजकीय पदाधिकारी व पुढाऱ्यांच्या मदतीने स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका सुरू करता येईल. नाहीतर कैलास सारखे कित्येक विद्यार्थी पुणे, पिंपरी, तळेगाव, वडगावला येऊन अभ्यास करताना दिसतात. सचिन कैलास भालेराव म्हणाले,"स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळतेच,पण अनेक जण यशाच्या जवळ येऊन ऐन शेवटच्या टप्प्यात त्यापासून दूर जातात, स्पर्धा परिक्षेची तयारीत यश मिळते हा दृढ विश्वास बळावला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com