सचिन पिळगावकर यांना "जीवन-कलागौरव पुरस्कार' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेले अभिनेते सचिन पिळगावकर यांना प्रकाश ढेरे चॅरिटेबल संस्थेचा "जीवन-कलागौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. 25 हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

संस्थेचे विश्‍वस्त संजय ढेरे आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाचे साहित्य व कलागौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यंदा या पुरस्कारांचे 31 वे वर्ष आहे. कवी वीरधवल परब (मम म्हणा फक्त), कवी साहेबराव ठाणगे (पाऊस पाणी), कवी डी. के. शहा (दंगल आणि इतर कविता) यांना साहित्य पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. 12) टिळक स्मारक मंदिर येथे रात्री साडेआठ वाजता होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: sachin pilgaonkar life-achievement award