Vidhan Sabha 2019 : शेट्टी, आरडे, वैरागे, जावळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 October 2019

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करून आज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी काँग्रेस पक्षातील पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी दिल्याने पुणे शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी 'तिकीट नाही तर नाही' या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी सात ते आठ हजार लोकांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.

कॅन्टोन्मेंट (पुणे) : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करून आज उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी काँग्रेस पक्षातील पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी दिल्याने पुणे शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी 'तिकीट नाही तर नाही' या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी सात ते आठ हजार लोकांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.

बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज आज (ता.04) दाखल केला. यावेळी शिवसेनेला पुण्यात एकही जागा न दिल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आहे. ही नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांनी आज अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तसेच भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष डॉ. भरत वैरागे यांनीही शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढून भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. 

मनीषा सरोदे यांचा मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मनीषा सरोदे यांनी 2017च्या  महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्र. 16 मध्ये निवडणूक लढवली होती. रमेश  बागवे, सुनील कांबळे यांच्या चुरशीच्या लढतीत आता सरोदे ही असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadanand Shetty aarade Vairage and Javele filed their nomination for assembly election