घरासाठी सदाशिव पेठच फेव्हरेट...

घरासाठी सदाशिव पेठच फेव्हरेट...

पुणे - वर्षभरात शहराच्या मध्यवस्तीतील सदाशिव पेठ, तर उपनगरातील खराडी भागात घरखरेदीसाठी सर्वाधिक पसंती मिळाली असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माहितीतून समोर आले आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत शहरात खरेदी-विक्रीचे एकूण ३९ हजार ५९८ दस्त नोंदविण्यात आले आहेत. या आकडेवारीवरून खराडी, बाणेर, कोथरूड आणि कोंढवे बुद्रुक या उपनगरांमध्ये घरखरेदी करण्यास नागरिकांनी सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.

शहरात १६ पेठा आणि ४० गावांचा समावेश होतो. प्रत्येक गाव आणि पेठनिहाय झालेले घरांच्या खरेदी-विक्रीचे दस्त संख्या नोंदणी विभागाने रेडिरेकनरमधील दर निश्‍चित करण्यासाठी अभ्यासले. यानुसार पुढील वर्षीचे (२०१९-२०) रेडिरेकनरचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत.

शहरापेक्षा उपनगरांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार जास्त होत असल्याचे दिसून आले आहे. शहराच्या मध्यवस्तीत सर्वाधिक व्यवहार हे सदाशिव पेठेमध्ये झाले आहेत. वर्षभरातील येथील दस्तांची संख्या ४२६ आहे. त्यापाठोपाठ शुक्रवार पेठेत २७६, कसबा पेठेत १४९, शनिवार पेठेत १२६, रविवार पेठेत ११२ व बुधवार पेठेत २१७ दस्त नोंदले आहेत.

उपनगरांमध्ये खराडी भागात सर्वाधिक खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. खराडीत २ हजार ५८५ दस्त नोंदविले आहेत. कोंढवे बुद्रुक येथे २ हजार २१७, बाणेरमध्ये २ हजार ४२४, हडपसरमध्ये १ हजार ९९५, कोथरूडमध्ये १ हजार ९५४ आणि कात्रजमध्ये १ हजार ९३४ दस्तांची नोंदणी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com