दोन्ही डोस घेतलेले लसवंतच सुरक्षित... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination
दोन्ही डोस घेतलेले लसवंतच सुरक्षित...

दोन्ही डोस घेतलेले लसवंतच सुरक्षित...

पुणे - कोरोना प्रतिबंधक लशीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस (Dose) घेतलेल्या केवळ नऊ टक्के नागरिकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झाला आहे. लस घेतल्याने अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे (Patient) प्रमाण अत्यल्प असल्याचा निष्कर्ष महापालिकेने (Municipal) केलेल्या विश्लेषणातून निघाला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांनी तातडीने लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण नऊ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढू लागली. शहरात गेल्या २२ महिन्यांमध्ये पाच लाख ८३ हजार ५३३ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची ही संख्या नियंत्रित करण्यासाठी गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, प्रौढ आणि तरुण अशा टप्प्याने लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्यात आला. या वर्षी तीन जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचेही लसीकरण सुरू झाले आहे.

आकडे बोलतात...

शहरात गेल्या वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही घेऊनही ३४ हजार ५४ जणांना कोरोना झाला, तर एक डोस घेतलेल्या सात हजार ४७१ रुग्णांना कोरोना झाल्याची नोंद झाली. शहरात गेल्या वर्षभरात चार लाख ६३२ जणांना कोरोना झाला. पण, त्यापैकी दोन्ही लस घेतलेल्या केवळ नऊ टक्के नागरिकांनाच कोरोनाचा संसर्ग झाला.

कोरोना प्रतिबंधक लस घेऊनही संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण बाधितांच्या तुलनेत कमी आहे. या नागरिकांना लस घेऊनही कोरोना झाला असला, तरीही त्यातील बहुतांश जण गृहविलगीकरण होऊन बरे झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज लागली नाही. सध्या शहरात ४२ हजार २६४ रुग्ण कोरोनाबाधित आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ४१ रुग्ण उपचारांसाठी इनवेसिव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे लस घेऊन अत्यवस्थ होणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य संचालक, पुणे महापालिका

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणात जिल्ह्यातील ग्रामीण भागाने घेतली आघाडी

लसीकरण किती झाले?

शहरात गेल्या एक वर्षामध्ये ६५ लाख ५८ हजार १२० डोस दिले आहेत. त्यात पहिला डोस ३७ लाख आठ हजार ६१८ नागरिकांनी घेतला असून, दुसऱ्या डोसची संख्या २८ लाख ५८ हजार १२० आहे.

कोरोना उद्रेक व प्रतिबंधात्मक लसीकरण...

  • शहरात नऊ मार्च २०२० ते २० जानेवारी २०२२ दरम्यान ५,८३,५३३ रुग्णांना कोरोना

  • शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे १६ जानेवारी २०२१ पर्यंत १,८२,९०१ जणांना कोरोना निदान झाले होते

  • १६ जानेवारीपासून कोरोनाचे लसीकरण सुरू

  • १६ जानेवारी २०२१ ते २० जानेवारी २०२२ दरम्यान ४,००,६३२ जणांना कोरोना संसर्ग

  • या दरम्यान लसीकरणाचा वेग वाढत होता.

Web Title: Safe In Both Corona Vaccine Doses

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top