गॅलरीमध्ये अडकलेल्या बालकाची सुखरूप सुटका 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

पिंपरी : लॅच लॉकचा दरवाजा बंद झाल्याने तीन वर्षीय मुलगा गॅलरीत अडकला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अवघ्या 15 मिनिटांमध्ये त्यांची सुटका केली. ही घटना वाकड येथे शुक्रवारी रात्री घडली. 

अर्नव जैन (वय 3, रा. गोल्डन ब्लेसिंग सोसायटी, गणेश मंदिराजवळ, वाकड), असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास अर्णव व त्यांची आई दोघेच घरात होते. शेजाऱ्यांना काहीतरी विचारण्यासाठी त्याची आई गेली. त्या वेळी हवेमुळे लॅच लॉक असलेला दरवाजा बंद होऊन तो गॅलरीत अडकला. सुमीत गुप्ता यांनी अग्निशामक दलास वर्दी दिली. 

रूपेश जाधव, विठ्ठल घुशे, लक्ष्मण होवाळे, नवनाथ शिंदे, रवींद्र अहिरे, सुधाकर गवळे हे अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीची पाहणी करून शेजारच्या फ्लॅटच्या खिडकीतून जैन यांच्या घरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये दहा फुटांचे अंतर होते. मात्र जीव धोक्‍यात घालून जवानांनी अवघ्या 15 मिनिटांमध्ये अर्णवची सुटका केली. सोसायटीमधील रहिवाशांनी अग्निशामक दलाचे आभार मानले. 

Web Title: safely remove child from gallery