भोसरी - लघुपटाला आवाज देताना एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर.
भोसरी - लघुपटाला आवाज देताना एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर.

सागरमाथाचे कार्य उलगडणार लघुपटातून

पिंपरी - भोसरीतील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त विशेष लघुपटाची निर्मिती होणार असून, यात स्थापनेपासून विविध गिर्यारोहण मोहिमा, सामाजिक कार्याचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यांमध्ये हा लघुपट पूर्ण होईल. आंतरराष्ट्रीय पर्वतदिनी (२९ मे) छायाचित्र प्रदर्शनही भरविण्याचा मानस आहे.  

दिवंगत रमेश गुळवे यांच्या पुढाकाराने संस्थेची स्थापना झाली. गुळवे हे उत्तम गिर्यारोहक होते. त्यांनी हिमाचल प्रदेश येथील ५ हजार ८०० मीटर उंचीच्या कान्हामो शिखरावर एकट्याने यशस्वी चढाई केली होती. तीच संस्थेची पहिली मोठी मोहीम ठरली. तेव्हापासून आजवरच्या कार्याचा आढावा लघुपटात घेतला जाणार आहे.

याबाबत एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर म्हणाले, ‘‘संस्थेच्या गिर्यारोहकांनी आतापर्यंत हिमालयीन पर्वतरांगांमध्ये जवळपास १० मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यात तांत्रिकदृष्ट्या अवघड मानले जाणारे मेंटोसा तसेच देवतिब्बा, मेन्टोक कांगरी, स्टोक कांगरी, माउंट मेरा या शिखरांचा समावेश आहे. २०१२ मध्ये संस्थेच्या गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्ट सर केले. याखेरीज सह्याद्रीमधील कुंडलिका, वानरलिंगी, लिंगाणा, वजीर आदी सुळके आणि गडकिल्ल्यांवरही यशस्वी चढाई केली. या सर्व सुवर्णक्षणांवर लघुपटात प्रकाश टाकला जाणार आहे. साधारण २० ते २५ मिनिटांचा हा लघुपट असेल. याशिवाय संस्थेच्या मोहिमांवरील छायाचित्र प्रदर्शन, आपत्ती व्यवस्थापन, आर-मार्क हिल मॅरेथॉन आदी उपक्रमांचीही माहिती दिली जाणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com