सर्व दु:ख विसरुन संत नामदेव पालखी सोहळा सुरु राहील: किर्तनकार बंडातात्या कराडकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

किर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांनी, ही दुर्दैवी घटना आज घडली असून, सर्व दु:ख विसरुन हा पाळखी सोहळा नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.

हडपसर : सासवड येथील दिवे घाटात जेसीबीचा ब्रेक निकामी झाल्याने वारकऱ्यांच्या दिडीत घूसून अपघात झाला. या अपघातात दोघा जंणाचा मृत्यू झाला तर, १९ जखमीवर हडपसर येथील नोबेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, याबाबत किर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांनी, ही दुर्दैवी घटना आज घडली असून, सर्व दु:ख विसरुन हा पाळखी सोहळा नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याचे सांगितले आहे.
 

अतुल आळशी (वय २४), सोपान तुलसीदास रामदास  (वय ३६) अशी या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. नामदार हे नामदेव महाराजांचे १७ वे वंशज आहेत. जखमींमध्ये विष्णू सोपान हळवाल (वय. ३५), शुभम नंदकिशोर अवारे (वय २३), दिपक अशोक लासुरे ( वय ९१), गजानन संतोष मानकर ( वय २०), वैभव लक्ष्मण बराटे (वय ३०), अभय अमृत मोकामपल्ले ( वय १९) किर्तीमन प्रकाश गिरजे (वय २३), अआकाश माणिकराव भाटे ( वय३०), ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ कदम( वय ४०) गरोबा जागडे (वय ३५), विनोद लहासे (वय ३०), नामदेव पूंजा सागर (वय ३४), महासाळकर (वय २५), गजानन मानकर ( २०), नामदेव पुंजा सागर (वय ३४), सोपान निमनाथ मासाळकर (वय २५),  सोपान मासळीकर या १९ जणांचा समावेश आहे. 

Imageलोणीकाळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडी पंढरपरहून आळंदीकडे निघाली होती. यावेळी जेसीपाचा ब्रेकफेल झाला. तो वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला. त्यामुळे हा अपघात झाला. तातडीने नागरिकांनी व पोलिसांनी जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Image
दरम्यान, जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील आज(ता.19) दुपारी तीन वाजता हडपसर येथील नोबल हॉस्पिटलला भेट देणार आहेत आहेत.  

Image


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saint Namdev Palkhi Ceremony will begin said Bandatatya Karadkar