Pune News : शालेय शिक्षणातच रुजणार संतविचारांचे बीज!

आळंदी देवस्थानच्या पुढाकारातून अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू
saint thoughts in school education initiative of Alandi Devasthan
saint thoughts in school education initiative of Alandi Devasthan sakal

आळंदी : संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी संतविचार गरजेचे असून, त्याचे संस्कार प्राथमिक शिक्षणापासून देण्याच्या दृष्टिने श्री ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ यांचा शालेय शिक्षणात प्रथमच स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून, त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पुढाकार घेतला आहे.

त्यांचा संकल्प होळीच्या मुहूर्तावर आज संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात करण्यात आला. ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा आध्यात्मिक प्रकल्प तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर सुरू करण्यासाठीची प्रक्रियेवर बैठकीत चर्चा झाली.

तसेच या प्रकल्पाचे पालकत्व घेण्याचा निर्णय आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी जाहीर केला. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मोफत स्वरुपात मिळणार असून, त्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

या बाबतची पार्श्वभूमी अशी की, आळंदीतील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यास एक आदर्श व्यक्ती घडविण्याच्या उद्देशाने "ओळख श्री ज्ञानेश्वरीची" या संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विचार शाळेतील मुलांना दिले जात आहे.

saint thoughts in school education initiative of Alandi Devasthan
Medical Education : जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणात अमर्याद संधी!

मागील वर्षीपासून या अभ्यासक्रमास सुरूवात करण्यात आली आहे. गेली वर्षभर विद्यार्थ्यांना दर रविवारी ज्ञानेश्वरीतील विचार शिकविण्याचे काम वारकरी संप्रदायातील सुभाष महाराज गेठे, भागवत महाराज साळुंके, उमेश महाराज बागडे, श्रीधर घुंडरे हे करीत आहेत.

ज्ञानेश्वरी ग्रंथावर विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यावर आधारित परीक्षा घेण्यात येते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुलांच्या विचारात याबाबत सुधारणा होताना दिसत आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता हा उपक्रम खेड तालुक्यातील शाळा तसेच जिल्हा, राज्य पातळीवर सुरु होवून संत ज्ञानेश्वरीतील विचारांचे संस्कार प्राथमिक शिक्षणापासूनच सुरू होण्याची नितांत गरज आहे.

या पार्श्वभूमीवर होळीच्या दिवशी आळंदी संस्थान, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि खेड तालुक्यातील शाळाप्रमुखांची बैठक झाली. त्यामध्ये ज्ञानेश्वरीवरील अभ्यासक्रमात सुधारणा करून त्यावर आधारित शिक्षण प्रणाली सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला. या वेळी आळंदी देवस्थानसह विविध शाळांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था यांची उपस्थिती होती.

saint thoughts in school education initiative of Alandi Devasthan
Education News : विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

यामध्ये आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, सकाळ संपादक सम्राट फडणीस, स्वामी निरंजननाथ महाराज, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, विश्वंभर पाटील, श्रीधर सरनाईक, विलास वाघमारे, प्रदीप काळे, हेमांगी कारंजकर, अॅड सचिन काळे, अॅड विष्णू तापकीर, दीपक पाटील हे उपस्थित होते. यावेळी अनेकांनी याबाबत मुद्दे मांडले. तसेच अनेकांनी हा उपक्रम राबविणार असल्याचेही जाहीर केले.

अजित वडगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम वर्षभरापूर्वी सुरू केला. विद्यालयात रविवारी सुटीचा वार असूनही विद्यार्थ्यांनी आवड लागली. त्यामुळेच रविवारी ते उपस्थिती दाखवित आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीबरोबरच हरिपाठ आणि मोफत चहा, नाष्टा देण्यात येतो. शालेय पाठ्यपुस्तकातील शालेय शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक शिक्षणाची जोड देण्याचा हा शिक्षणातील आळंदी पॅटर्न इतर शाळांनी राबविण्याची गरज आहे.

प्रकाश काळे म्हणाले, प्रसिद्धी माध्यमांमुळे उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढेही प्रसिद्ध माध्यमांनी जबाबदारी घेऊन अधिकची प्रसिद्धी या उपक्रमास दिली तर चांगला समाज तयार होण्यास मदत होईल. विद्यार्थी आणि पालकवर्गांसाठी अशा उपक्रमातून चांगले कुटूंब तयार होण्यास सकारात्मक उर्जा मिळेल.

saint thoughts in school education initiative of Alandi Devasthan
ISRO Free Education : विद्यार्थ्यांना आता इस्रोच्या शास्त्रज्ञांकडून घेता येणार मोफत शिक्षण

स्वामी निरंजननाथ महाराज म्हणाले, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून हरिनाम सप्ताह, दिंडी सोहळे, वारी यांच्या माध्यमातून संतांचे विचार दिले जातात. मात्र, मुले, तरुणांची संख्या नगण्य असते. शालेय स्तरावर असा अभ्यासक्रम राबविला गेल्यास भावी पिढी निश्चितच संस्कारक्षम बनेल.

निव्वळ शालेय स्तरावरच नाही तर महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच निवृत्त झालेल्यांनाही अध्यात्माचे शिक्षण शिकण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर शालेय अभ्यासक्रमात संत साहित्याचा समावेश करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.

उमेश महाराज बागडे म्हणाले, ज्ञानेश्वरीतील अठरा अध्यायांना अनुसरून विद्या्र्थ्यांना पाठ शिकवला जातो. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण नाही तर त्यांच्या मनातील अभ्यासक्रमातील प्रश्न, जीवन जगताना निर्माण होणाऱ्या अडचणी यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले जाते.

saint thoughts in school education initiative of Alandi Devasthan
Child Education : सधन कुटुंबांतल्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न खरंच सुटले आहेत का ?

चौथीपासूनचे विद्यार्थी हरिपाठ तर आठवीपासूनच्या पुढच्या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीबाबत शिक्षण दिले जाते. परिणामी लहानपणापासून विद्यार्थ्यांना संतांबाबत जिज्ञासा निर्माण होते, ही निर्भेळ आणि निकोप पिढीचे लक्षण आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची परीक्षाही घेतली जाते. त्यामधून विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी चांगले गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात येते.

प्रदीप काळे म्हणाले, ओळख ज्ञानेश्वरीच्या उपक्रमासाठी लांबच्या अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जाानेवारीत सायकल देण्यात आली. चाकणचे उद्योगपती नारायण गावडे यांनी या सायकल उपलब्ध करून दिल्या. आळंदीतील प्राजक्ता हरपळे यांनी उपक्रमाचे शुटिंगसाठी एक लाख रुपयांचा कॅमेरा आणि मुलांना उत्तेजन म्हणून दप्तरे मोफत दिली. चांगल्या उपक्रमास दातृत्व आपोआप मिळून जाते. ही संतांचीच कृपा म्हणावी लागेल.

योगेश देसाई म्हणाले, आळंदीमध्ये शालेय स्तरावर सुरू असलेला ओळख ज्ञानेश्वरीचा उपक्रम हा चांगला आहे. देवस्थानच्यावतीने आम्ही संत चरित्रे, संत साहित्य समाजाला पुरवित असतो. ज्ञानेश्वरीचे वाटप आजवर केले. मात्र शालेय स्तरावरिल विद्यार्थ्यांना अशा अभ्यासक्रमाचा निश्चित चांगला फायदा होईल. यासाठी देवस्थान पुढाकार घेवून या उपक्रमाचे पालकत्व स्वीकारून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.

saint thoughts in school education initiative of Alandi Devasthan
Education: इयत्ता पहिलीत सहाव्या वर्षी प्रवेश

सम्राट फडणीस म्हणाले, सकाळ कायम वारकरी संप्रदायाच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी असते. आषाढी वारीत पुण्यातील अनेकांना चालण्याची इच्छा असते मात्र, त्यांना नेमकेपणाने कसे सहभागी व्हावे, हे माहीत नसते. याच पार्श्वभूमीवर सकाळने दोन वर्षांपासून वारीत साथ चल हा उपक्रम देहू, आळंदी संस्थानच्या मदतीने पुण्यात केला.

त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. निकोप आणि आदर्श समाज निर्माण करण्यासाठी शालेय पातळीवर सुरू असणारा आळंदीतील उपक्रम अतिशय चांगला आहे. तो उपक्रम राज्यपातळीवर जाण्यासाठी सकाळ थेट सहभागी होईल. त्याचा अधिकाधिक प्रचार करण्यासाठी लागेल ती मदत करण्यात सकाळ तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com