शुभेच्छांच्या वर्षावात रंगला आनंदसोहळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे -  गेल्या आठ दशकांच्या दृढ नात्याची साक्ष देणारा सोहळा आज ‘सकाळ’मध्ये रंगला. ‘सकाळ’च्या ८७ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधत अनेक मान्यवरांसह हितचिंतक, वाचकांनी भेट देत शुभेच्छांचा वर्षाव केला. कला-क्रीडा, शिक्षण, प्रशासन, पोलिस आदी क्षेत्रांतील अनेकांनी या आनंदमयी सोहळ्यास हजेरी लावली. 

प्रत्येक पुणेकराला आपला वाटणाऱ्या ‘सकाळ’ने आज ८८व्या वर्षात पदार्पण केले. अनेक दशके या वर्तमानपत्रावर प्रेम करणारा वाचक हाच ‘सकाळ’चे बलस्थान राहिले आहे. दरवर्षी वर्धापनदिनी आठवणीने, आवर्जून स्नेहमेळाव्यास होणारी गर्दी या अतूट नात्याचा दाखला देत राहते. या वर्षीदेखील वाचकांच्या या प्रेमाचा प्रचंड ओघ बुधवार पेठेतील ‘सकाळ’ कार्यालयात वाहिला.

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, संचालक भाऊसाहेब पाटील, संपादक संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, उदय जाधव, पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांची भेट घेऊन प्रत्येकजण ‘सकाळ’च्या वाटचालीस शुभेच्छा देत होता. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम आदी या सोहळ्यास उपस्थित  होते. ‘सकाळ’चा वर्धापन दिन हा मैत्र वृद्धिंगत करणाराही असतो. वाचक, अनेक क्षेत्रांतील दिग्गजांनी आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि मित्रपरिवारांच्या भेटीत त्यांच्या गप्पाही रंगल्या.

Web Title: Sakal 87th Anniversary celebration in pune

टॅग्स
फोटो गॅलरी