"सकाळ'बरोबर सेलिब्रेशन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - नववर्षाचा पहिला दिवस "सेलिब्रेट' करतानाच महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र असलेल्या "सकाळ'चा वर्धापन दिनही तितक्‍याच उत्साहात साजरा करणे, हे तमाम पुणेकरांसाठी आनंदी समीकरणच बनून राहिले आहे. यंदाचेही वर्ष त्यापेक्षा वेगळे नव्हते. त्यामुळेच वर्धापन दिन सोहळ्याला पुणेकरांची तुडुंब गर्दी झाली होती. "सकाळ'शी आमचे नाते किती दृढ आहे, याचीच प्रचिती गर्दीने दिली. 

पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील वाचकांचे लाडके वृत्तपत्र असलेल्या "सकाळ'चा 85वा वर्धापन दिन सोहळा "सकाळ'च्या कार्यालयात रविवारी आयोजिण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर प्रशांत जगताप, पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, "मराठा चेंबर ऑफ कॉमर्स'चे अध्यक्ष प्रमोद चौधरी, अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, गायक राहुल देशपांडे, संजीव अभ्यंकर, सलील कुलकर्णी, उद्योजक फत्तेचंद रांका, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, डॉ. कुमार सप्तर्षी, पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र शेंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन यांच्यासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, शिक्षण, कला अशा नानाविध क्षेत्रांतील वाचकांनी उपस्थित राहून "सकाळ'ला भरभरून शुभेच्छा दिल्या. 

सायंकाळचे पाच वाजताच अनेकांची पावले "सकाळ'च्या वर्धापन दिन सोहळ्याकडे वळू लागली. कोणी पुष्पगुच्छ घेऊन, तर कोणी गुलाबाची फुले सोबत आणत... कोणी "सकाळ'वर स्वरचित कविता रचत, तर कोणी चित्रांमधून "सकाळ' रेखाटत... एकमेकांना अत्तर लावत, तर कोणी एकमेकांना पेढा भरवत... कोणी सेल्फी घेत, तर कोणी आपल्याच कॅमेऱ्यात सोहळ्याचे आनंददायी क्षण टिपत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मनात "हा आपलाच सोहळा आहे,' अशी भावना होती. त्यामुळे गर्दीतल्या प्रत्येकाचा चेहरा आनंदाने फुललेला होता. क्षणाक्षणाला मान्यवर आणि वाचकांची गर्दी वाढत होती. वाफाळणाऱ्या कॉफीसोबत एकमेकांत रंगणाऱ्या गप्पा आणि एकमेकांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा यामुळे हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. 

Web Title: Sakal Anniversary Day rush readers

टॅग्स