विविध कंपन्यांच्या गाड्या एकाच छताखाली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

पुणे - स्वतःची कार घेण्याच्या स्वप्नाला आकार देणाऱ्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ला शनिवारी वाहनप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजिलेल्या या एक्‍स्पोत विविध नामांकित कंपन्यांच्या गाड्या पाहायला मिळाल्या. नव्या कारसोबतच रिसेल कारचीही मोठी शृंखलाही येथे पाहता आली. रविवारी (ता. १८) एक्‍स्पोचा शेवटचा दिवस असून, वाहनप्रेमींना कार घेण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. कारच्या वेगवेगळ्या डिझाइन्स, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यातील वेगळेपणा वाहनप्रेमींच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

या एक्‍स्पोचे उद्‌घाटन ‘सकाळ’ पुणेचे सरव्यवस्थापक राकेश मल्होत्रा आणि विविध कार कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या हस्ते झाले. एकाच छताखाली चोखंदळ वाहनप्रेमींना भुरळ घालणाऱ्या जगातील उत्कृष्ट कंपन्यांच्या गाड्यांचा खजिना उपलब्ध झाला आहे. एक्‍स्पोमध्ये शरयू टोयाटो, ह्युंदाई, विराज स्कोडा, रोहर्ष मोटर्स रेनॉ, मायकार नेक्‍सा, होंडा कार्स, बी. यू. भंडारी फोक्‍सवॅगन आदी कंपन्या सहभागी झाल्या असून, होंडा ऑटो टेरेसच्या प्री ऑन कारची माहितीही या ठिकाणी उपलब्ध झाली आहे.

उत्कृष्ट डिझाईनसह सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले फीचर्स कार्समध्ये पाहता येतील. स्मॉल कार, सेडान कार, हॅच बॅक कार, लक्‍झरी कार, एसयूव्ही, स्पोर्ट अशा कितीतरी गाड्यांची माहिती, त्यांच्या किमती आणि ईएमआयसंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरे या एक्‍स्पोत मिळतील. आवडतील अशा रंगसंगतीसह आरामदायी आणि खात्रीशीर प्रवासाची हमी देणाऱ्या आणि कुटुंबातील सर्वांना वापरता येईल, अशा सर्व कार येथे आहेत. लोकांच्या बजेटमधील कार येथे उपलब्ध असून, या एक्‍स्पोमुळे कार घेणे सोपे होणार आहे. हा एक्‍स्पो रविवारपर्यंत (ता. १८) सकाळी अकरा ते रात्री सात या वेळेत खुले राहील.

कालावधी - रविवारपर्यंत (ता. १८)
स्थळ - पंडित ऑटो फार्मस, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर
वेळ - सकाळी अकरा ते रात्री सात
प्रवेश आणि वाहनतळाची सुविधा मोफत

पहिल्यांदाच या एक्‍स्पोला भेट दिली. यात सादर करण्यात आलेल्या कार खूप आवडल्या. सुरक्षितता आणि गुणवत्ता हे कार्सचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. ‘सकाळ’ने वाहनप्रेमींसाठी ही संधी उपलब्ध करून दिल्याचा आनंद आहे.
- चैतन्य कुलकर्णी, वाहनप्रेमी

Web Title: sakal auto expo 2017