मनपसंत कार, बाइक निवडण्याची संधी; आज, उद्या ऑटोमोबाइलचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Auto Expo 2022

कोरोनानंतर ऑटोमोबाइलचीही बाजारपेठ उजळली असून अनेक कंपन्यांनी त्यांची नवी मॉडेल्स बाजारपेठेत आणली आहेत.

मनपसंत कार, बाइक निवडण्याची संधी; आज, उद्या ऑटोमोबाइलचे प्रदर्शन

पुणे - कोरोनानंतर ऑटोमोबाइलचीही बाजारपेठ उजळली असून अनेक कंपन्यांनी त्यांची नवी मॉडेल्स बाजारपेठेत आणली आहेत. त्यामुळे स्वप्नातील बाइक किंवा कार घेण्यासाठी ग्राहकांना मुबलक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

विशेषतः ई- वाहनांमध्ये बहुविध पर्याय आले आहेत. तसेच वाहन खरेदीसाठी वित्त कंपन्यांनीही आकर्षक योजना सादर केल्या आहेत. बदलते ट्रेंड आणि वाहनांमधील नवे पर्याय लक्षात घेऊन ‘सकाळ’ने ऑटो एक्स्पो आयोजित केले असून त्याचे उदघाटन शनिवारी (ता. २४) होणार आहे. रविवारपर्यंत (ता. २५) ते सर्वांसाठी खुले आहे.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे हा दोन दिवसांचा ऑटो एक्‍स्पो होणार असून बजेट कार्स, सेडान कार्स, हॅचबॅक कार्स, एसयुव्ही, स्पोर्ट, इलेक्ट्रिक कार्स, बाइक्स अशा कितीतरी गाड्यांची माहिती मिळणार आहे. अनेक नव्याने लाँच झालेल्या गाड्याही येथे पाहायला मिळतील. वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचे अनेक पर्यायही येथे उपलब्ध आहेत. त्यांच्या ईएमआयसंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरेही ग्राहकांना याठिकाणी मिळणार आहेत. हा एक्‍स्पो सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वेगाने बदल होत आहेत. इलेट्रॉनिक वाहनांबरोबरच ऑटोमॅटिक कार्सचीही संख्या वाढत आहे. तसेच एसयूव्हीमध्येही अनेक प्रकार बाजारपेठेत आले आहेत. पेट्रोल, डिझेलबरोबरच सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांचीही बाजारपेठ विस्तारत आहे. यंदाच्या नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्ताने देशातील-परदेशांतील अनेक उत्पादक कंपन्यांनी नवी मॉडेल्स लाँच करण्याची तयारी केली आहे. त्याची माहिती ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ‘ऑटो एक्स्पो २०२२’ मध्ये मिळणार आहे.

हे लक्षात ठेवा

  • काय : सकाळ ऑटो एक्स्पो २०२२

  • कुठे : पंडित फार्म, डीपी रोड, कर्वेनगर

  • कधी : २४ आणि २५ सप्टेंबर

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

  • प्रवेश व पार्किंग मोफत

Web Title: Sakal Auto Expo 2022 Exhibition Cars Bikes Start Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BikescarSakalexhibition