‘ऑटो एक्स्पो २०२२’ मधून करा वाहन खरेदीचे स्वप्न साकार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ऑटो एक्स्पो २०२२’ मधून करा वाहन खरेदीचे स्वप्न साकार!

‘ऑटो एक्स्पो २०२२’ मधून करा वाहन खरेदीचे स्वप्न साकार!

पुणे - नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांचे गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने ‘ऑटो एक्स्पो २०२२’ भरविण्यात आला आहे. शनिवारी (ता. २४) दिमाखदार सोहळ्यात या एक्स्पोचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित पाटील, ‘सोनक टोयोटा ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक विकास गोदरा, ‘मारुती सुझुकी’चे प्रादेशिक प्रमुख किशोर कौशल, ‘अरिहान सुझुकी’चे संचालक चैतन्य सिन्नरकर, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, मुख्य विपणन अधिकारी नवल तोष्णीवाल, संपादक सम्राट फडणीस आणि नॅशनल ॲड सेल सहायक महाव्यवस्थापक रवी काटे या वेळी उपस्थित होते. उद्‍घाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘एक्स्पो’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासून सुरू झालेली गर्दी रात्रीपर्यंत कायम होती. जाधव यांनीदेखील आपली भावना व्यक्त केली. फडणीस यांनी आभार मानले.संबंधित वृत्त ५ वर

वाहनांचे बजेटनुसार अनेक पर्याय

पेट्रोल, डिझेल, ईलेक्ट्रॉनिक कार आणि दुचाकीचे अनेक पर्याय नागरिकांना या ‘एक्स्पो’त उपलब्ध आहेत. एकाच बजेटचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने कोणती गाडी घ्यायची याचा निर्णय घेणे ‘एक्‍स्पो’च्या माध्यमातून सोपा होणार आहे. ‘एक्स्पो’मध्ये ईलेक्ट्रिक वाहनांचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

ऑटो एक्स्पोविषयी

  • कोठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • केव्हा : २५ सप्टेंबरपर्यंत

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

  • सुविधा : प्रवेश व पार्किंग मोफत

Sakal Auto Expo 2022

Sakal Auto Expo 2022

समाजातील सर्व वयोगटांसाठी ‘सकाळ’ नेहमीच जागृतपणे वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. मोटार व दुचाकीच्या खरेदीसाठी ‘एक्स्पो’च्या माध्यमातून एक चांगली संधी नागरिकांना मिळाली आहे. सर्वच क्षेत्रांसाठी ‘सकाळ’ने मोठे काम केले आहे.

- मुरलीधर मोहोळ, माजी महापौर

पुण्यात ४५ लाख वाहनांची नोंदणी आहे. या आकड्यांवरून नागरिकांना वाहनांची गरज असल्याचे स्पष्ट होते. ती गरज या ‘एक्स्पो’च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. पूर्वी पुण्यातील अनेक बंगल्यांत पार्किंग नसल्याचे; मात्र पार्किंग असेल तरच आता बांधकामाला परवानगी मिळते, ही एक क्रांती असून तिला पुढे नेण्याचे काम ‘सकाळ’ करत आहे.

- अजित पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

९० वर्षांपूर्वी लावलेल्या ‘सकाळ’च्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या सावलीत अनेक उपक्रमांना गती मिळाली. सामाजिक जबाबदारीचे अस्तित्व ‘सकाळ’मध्ये आहे. हा उपक्रम अनेकांना फायदेशीर ठरणार आहे. या माध्यमातून वाहन क्षेत्राला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ‘सकाळ’चे अभिनंदन.

- विकास गोदरा, व्यवस्थापकीय संचालक, सोनक टोयोटा ग्रुप

माझे आणि ‘सकाळ’चे अनेक वर्षांचे नाते आहे. समाजाचे विविध अंग व प्रश्‍न ‘सकाळ’ सातत्याने सकारात्मक कामांसाठी मांडत आहे. वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत ग्राहकांचा शोध सोपा करणे हा उद्देश या ‘एक्स्पो’चा आहे. त्याचा व्यावसायिक आणि ग्राहकांना नक्कीच फायदा होईल.

- किशोर कौशल, प्रादेशिक प्रमुख, मारुती सुझुकी