मनपसंत कार निवडण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

यंदाच्या दसरा व दिवाळी सणानिमित्त आपल्या घरी स्वप्नातली कार यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २१) व रविवारी (ता. २२) भव्य ‘ऑटो एक्‍स्पो २०१९’ चे आयोजन केले आहे.

पुणे - यंदाच्या दसरा व दिवाळी सणानिमित्त आपल्या घरी स्वप्नातली कार यावी, असे प्रत्येकालाच वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २१) व रविवारी (ता. २२) भव्य ‘ऑटो एक्‍स्पो २०१९’ चे आयोजन केले आहे.

ऐनवेळी कार घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फीचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. पण, या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात तेव्हा खऱ्या अर्थाने कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. याचाच विचार करून ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ऑटो एक्‍स्पोचे आयोजन केले आहे.

महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे दोनदिवसीय एक्‍स्पो होणार असून, सकाळी ११ ते रात्री ७ या वेळेत सर्वांसाठी हा एक्‍स्पो विनामूल्य खुला आहे. प्रवेश व पार्किंग मोफत आहे. बजेटनुसार कार घेणाऱ्यांसाठी हा एक्‍स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, या ठिकाणी विविध कार ब्रॅंड्‌सच्या फीचर्सची माहिती मिळणार आहे. बी. यू. भंडारी-फोक्‍सवॅगन पुणे, ह्युंदाई मोटर्स, गारवे स्कोडा, होंडा कार्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या कंपन्या सहभागी होणार आहेत. स्मॉल कार्स, सेडान कार, हॅच बॅक कार, एसयूव्ही अशा गाड्यांची माहिती मिळणार आहे. त्यांच्या किमती आणि ईएमआयसंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरेही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Auto Expo