एकाच छताखाली कारच्या वेगवेगळ्या डिझाइन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

कारप्रेमींनी केले कारचे थेट बुकिंग; एक्‍स्पोचा आज शेवटचा दिवस

कारप्रेमींनी केले कारचे थेट बुकिंग; एक्‍स्पोचा आज शेवटचा दिवस
पुणे - अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर कार घेण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या ‘सकाळ ऑटो एक्‍स्पो’ला शनिवारी कारप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध नामवंत कंपन्यांच्या कारच्या फिचर्सची माहिती घेण्यासह कारप्रेमींनी कारचे थेट बुकिंगही केले. वैविध्यपूर्ण रंगसंगती आणि बजेटमधील कारच्या मोठ्या शृंखलेने कारप्रेमींना आकर्षित केले. एकाच छताखाली कारच्या वेगवेगल्या डिझाइन आणि फीचर्स कारप्रेमींना पाहायला मिळाले. तर प्री-ओन्ड कारची मोठी रेंजही कारप्रेमींच्या पसंतीस उतरली. रविवारी (ता. १६) एक्‍स्पोचा समारोपाचा दिवस असून, कार खरेदीची शेवटची संधी आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ऑटो एक्‍स्पोमधून अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न पहिल्या दिवशीच पूर्ण झाले. या एक्‍स्पोचे उद्‌घाटन माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्‍वस्त आणि उपाध्यक्ष राहुल कराड यांच्या हस्ते शनिवारी झाले. ‘बॅंक ऑफ महाराष्ट्रा’च्या पुणे विभागाचे सरव्यवस्थापक (क्रेडिट अँड प्रायॉरिटी) सी. के. वर्मा,  ‘सकाळ माध्यम समूहा’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने कराड यांनी टोयाटो कंपनीच्या ‘करोला अल्टिस’ या नवीन कारचे उद्‌घाटनही केले.

या एक्‍स्पोत ह्युंदाई, विराज स्कोडा, विद्युत मोटर्स-फोक्‍सवॅगन, शरयू टोयाटो, शिव निसान, रोहर्ष मोटर्स-रेनॉ, होंडा कार्स, माय कार नेक्‍सा आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत. मारुती ट्रू व्हॅल्युच्या प्री-ओन्ड कारची माहितीही कारप्रेमींना मिळणार आहे. स्मॉल कार्स, सेडान कार, हॅचबॅक कार, लक्‍झरी कार, एसयूव्ही, स्पोर्ट अशा कितीतरी कारची माहिती एकाच छताखाली कारप्रेमींना घेता येणार आहे. त्यासोबतच त्यांच्या किमती आणि ईएमआय घेण्यासंबंधीची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, थेट कारसाठी लोनची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे फीचर्ससह नामवंत कार खरेदी करण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र हे प्रदर्शनाचे बॅंकिंग पार्टनर आहे. हा एक्‍स्पो रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री सात या वेळेत कर्वेनगर येथील (म्हात्रे पुलाजवळ) पंडित फार्म्स येथे पाहावयास खुला आहे. 
 

‘सकाळ’ नेहमीच पुणेकरांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविते. ऑटो एक्‍स्पो त्यातीलच एक भाग असून, एकाच छताखाली वेगवेगळ्या नामवंत कंपन्यांच्या कार लोकांना पाहायला मिळणार असल्याचा आनंद आहे. कंपन्यांना आपले ऑटोमोबाईल ब्रॅंड्‌स सादर करण्यासाठीचे हे एक व्यासपीठ आहे. ‘सकाळ’च्या व्यापक उपक्रमाचा हा एक भाग असून, समाज जोडण्यासाठीचे हे माध्यम आहे.
- राहुल कराड, उपाध्यक्ष, माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

बाजारात दर दिवसाला कंपन्या आपले कारचे नवीन ब्रॅंड सादर करत आहेत. या ब्रॅंड्‌सना एकाच छताखाली व्यासपीठ देण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीत कारचे ब्रॅंड्‌स नक्कीच पसंतीस उतरतील. त्यामुळे कार घेण्याचे स्वप्न असणाऱ्यांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्राने कर्जाची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे लोकांची स्वप्नं नक्कीच साकार होणार आहेत.
- सी. के. वर्मा, सरव्यवस्थापक (क्रेडिट अँड प्रायॉरिटी), पुणे विभाग, बॅंक ऑफ महाराष्ट्र

स्थळ - पंडित फार्म्स, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर
सुविधा - प्रवेश व पार्किंग मोफत
कालावधी - रविवारपर्यंत (ता. १६)
वेळ - सकाळी अकरा ते रात्री सात

Web Title: sakal auto expo