सौंदर्यस्पर्धेचा क्राऊन अनावरण सोहळा रंगला 

Sakal-Beauty-of-Maharashtra
Sakal-Beauty-of-Maharashtra

पुणे - वेळ प्रसन्न सायंकाळची... सातारा रस्त्यावरील "पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.'मध्ये ग्राहकांची गर्दी... प्रत्येकजण सुवर्णालंकार पाहण्यात दंग...अन्‌ त्यातच पांढरा टी-शर्ट, ब्लू-ब्लॅक जीन्स अन्‌ पेन्सिल हिल्सचे सॅंडल घालून एकामागून एक सौंदर्यवती येत होती अन्‌ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती... निमित्त होते "सकाळ माध्यम समूहा'ने आयोजिलेल्या "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2020' स्पर्धेच्या क्राऊन अनावरण सोहळ्याचे... 

राज्यातील तरुणींच्या कलागुणांना संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील 21 तरुणींची निवड केली असून, त्यामधून मंगळवारी (ता. 25) अंतिम फेरी घेण्यात येणार आहे. दरम्यान, या सर्व तरुणींचे आज पुण्यात स्वागत करण्यात आले. त्यांना कोरिओग्राफर आणि स्पर्धेचे दिग्दर्शक लोवेल प्रभू यांनी ग्रुमिंग करून वेगवेगळ्या टिप्स दिल्या; तसेच नीलम बनसोडे, डॉ. संजय चोरडिया व डॉ. अक्षया जैन यांनी मार्गदर्शन केले. या सर्व तरुणींची ड्रेस फिटिंग "हस्तकला'च्या करिना शिवानी करत असून, गाऊन फिटिंग शिवानी खुलर करत आहेत. 

दरम्यान, या स्पर्धेच्या अंतिम फेरीची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. अंतिम विजेत्या; तसेच उपविजेत्या तरुणींसाठी तीन क्राऊन तयार केले आहेत. त्यांचे अनावरण आज सायंकाळी सातारा रस्त्यावरील "पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.'च्या दालनात अध्यक्ष व संचालक अजित गाडगीळ व संचालक डॉ. रेणू गाडगीळ, "सकाळ'चे बिझनेस हेड (इव्हेंट्‌स) राकेश मल्होत्रा यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रत्येक तरुणी क्राऊनकडे पाहून भारावून गेली होती. या सोहळ्यानंतर सर्व तरुणी दालनामधील सुवर्णालंकार पाहण्यात दंग झाल्या होत्या. सोने खरेदीसाठी आलेले ग्राहक सौंदर्यवती तरुणींसमवेत सेल्फीही घेत होते. त्याचप्रमाणे अनेकांनी तरुणींसमवेत रॅम्पवॉकचाही आनंद घेतला. या वेळी काही उपक्रम राबविण्यात आले. त्यातून काही ग्राहकांना "पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.'तर्फे डिस्काउंट कूपन देण्यात आले. 

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक "पु. ना. गाडगीळ आणि सन्स' आहेत. सहप्रायोजक रावेतकर ग्रुप व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आहेत; तसेच हेअर अँड मेकअप पार्टनर लीझ ब्यूटी सेंटर अँड स्पा, फॅशन पार्टनर आयएनआयएफडी पिंपरी-चिंचवड, इथेनिकवेअर पार्टनर हस्तकला सारिज, वेलनेस पार्टनर डॉ. बनसोडेझ आयुर्वेद पंचकर्म रिसर्च सेंटर, बिस्पोक काऊचर पार्टनर फ्रेंच नॉट, अस्थेटिक पार्टनर स्कीन स्टील एटिंग, ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज, कोरिओग्राफर आणि स्पर्धेचे दिग्दर्शक ग्रुमर लोवेल प्रभू, फॅशन फोटोग्राफर जितेश पाटील आणि व्हेनू पार्टनर अमनोरा द फर्न हॉटेल अँड क्‍लब आहेत. 

आज दोन दालनांना भेट 
"सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2020' स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवडलेल्या 21 तरुणी आज शनिवारी (ता. 22) सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत "पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.'च्या कोथरूडमधील हॅपी कॉलनी व पिंपरी-चिंचवडमधील चापेकर चौकामधील उड्डाण पुलाजवळील दालनाला भेट देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com