सौंदर्यवतींसमवेत आबालवृद्धांचे रॅम्पवॉक 

सौंदर्यवतींसमवेत आबालवृद्धांचे रॅम्पवॉक 

पुणे - पांढरे शुभ्र टी-शर्ट, ब्लू जिन्स अन पेन्सिल हिल्सचे सॅंडल घालून आलेल्या सौंदर्यवतींसमवेत रेड कार्पेटवर आबालवृद्ध रॅम्पवॉक करत होते... आपल्याला पाहिजे तशी पोझ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उजळून निघत होते... एवढंच नव्हे, तर सौंदर्यवतींसमवेत सेल्फी घेण्यासाठीही गर्दी होत होती... हे दृश्‍य कुठल्या चित्रपटातील नव्हे, तर औंधमध्ये आयोजित कार्यक्रमातील होते... 

"सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2020' स्पर्धेत अंतिम फेरीत पोचलेल्या तरुणींनी आज सायंकाळी औंधमधील "पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.'च्या दालनाला भेट दिली. अलंकार खरेदीसाठी आलेले ग्राहक सौंदर्यवतींना पाहून थक्कच झाले. या वेळी दालनाच्या वतीने ग्राहकांसाठी काही स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सौंदर्यवतींनी विचारलेल्या प्रश्‍नांना अचूक उत्तर देणाऱ्यांना गिफ्टही देण्यात आले. याचदरम्यान, दालनामधील रेड कार्पेटवर अनेकांना सौंदर्यवतींसमवेत रॅम्पवॉक करण्याची संधी मिळाली. "फॅशन का है ये जलवा...' या गाण्याच्या तालावर आबालवृद्ध तरुणींसमवेत रॅम्पवॉक करत होते. त्याचे फोटो अन व्हिडिओ घेण्यासाठीही गर्दी होत होती. मला नाही जमणार... असं म्हणून अनेक जण पुन्हा मोठ्या धाडसाने पहिल्यांदाच रॅम्पवॉक करतानाही दिसत होते. हा अनोखा अन अनपेक्षित कार्यक्रम पाहून प्रत्येकाचा चेहरा आनंदाने भारावून जात होता. दरम्यान, या वेळी दालनाचे समन्वयक मुकुंद कुलथे, विक्री विभागाचे उपव्यवस्थापक शशी कुमार, मार्केटिंग अधिकारी आश्‍विन कुलकर्णी यांनी ग्राहकांसह सौंदर्यवतींचे स्वागत केले. 

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक "पु. ना. गाडगीळ आणि सन्स' आहेत. सहप्रायोजक रावेतकर ग्रुप व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आहेत; तसेच हेअर अँड मेकअप पार्टनर लीझ ब्यूटी सेंटर अँड स्पा, फॅशन पार्टनर आयएनआयएफडी पिंपरी-चिंचवड, इथेनिकवेअर पार्टनर हस्तकला सारीज, वेलनेस पार्टनर डॉ. बनसोडेज आयुर्वेद पंचकर्म रिसर्च सेंटर, बिस्पोक काऊचर पार्टनर फ्रेंच नॉट, अस्थेटिक पार्टनर स्किनटिलेटिंग, ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज, कोरिओग्राफर अँड टॅलेंट ग्रुमर लोवेल प्रभू, फॅशन फोटोग्राफर जितेश पाटील आणि व्हेनू पार्टनर अमनोरा द फर्न हॉटेल अँड क्‍लब हे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com