आरोग्यमंत्र आहार अन्‌ व्यायामाचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आहार व व्यायामाशी संबंधित सुयोग्य बदल घडवून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा जीवघेण्या आजारांना प्रतिबंध कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ प्रकाशना’ने व्याख्यानांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

पुणे - आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आहार व व्यायामाशी संबंधित सुयोग्य बदल घडवून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा जीवघेण्या आजारांना प्रतिबंध कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ प्रकाशना’ने व्याख्यानांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता ज्योत्स्ना भोळे सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

ताणतणाव, आहार व व्यायामाच्या अभावामुळे ऐन तारुण्यातच माणसे अनेक व्याधींना बळी पडतात. या व्याधींच्या मुळाशी आहे चुकीची जीवनशैली. त्यामुळे जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी आहारतज्ज्ञ डॉ. सीमा सोनीस या ‘जीवनशैलीजन्य आजारांना आहाराद्वारे प्रतिबंध’ या विषयावर, ज्येष्ठ सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. प्रशांत नाईकवाडी ‘विषमुक्त अन्न’ या विषयावर तर योगतज्ज्ञ मनाली देव या ‘आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पूरक योगासने’ या विषयावर सप्रयोग मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

पुस्तकांसाठी संपर्क
‘सकाळ प्रकाशना’तर्फे डॉ. सीमा सोनीस यांचे ‘हेल्दी आहारशैली’, डॉ. नाईकवाडी यांचे ‘तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती’ आणि मनाली देव यांचे ‘कीप फिट’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली असून वाचकांनी ती गौरविली आहेत. अधिक माहितीसाठी सकाळ पुस्तक दालन, ५९५, बुधवार पेठ, पुणे- २ येथे किंवा ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. वरील पुस्तके www.sakalpublications.com / amazon.in / bookganga.com वर ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Book Publish Health Food Exercise