‘सकाळ करंट अपडेट्‌स’ त्रैमासिक प्रकाशित

‘सकाळ करंट अपडेट्‌स’ त्रैमासिक प्रकाशित

पुणे - आगामी काळात होणाऱ्या राज्य गट क सेवा- दुय्यम निरीक्षक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक (मुख्य), महापरीक्षा भरती अंतर्गत कनिष्ठ लिपिक, पोलिस कॉन्स्टेबल, मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन, बॅंकिंग, एलआयसी व या इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयांच्या तयारीसाठी उपयुक्त असलेल्या ‘सकाळ करंट अपडेट्‌स’ (Sakal Current Updates) त्रैमासिकाचा व्हॉल्युम ३ (vol.३) अंक प्रकाशित झाला आहे. 

पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्ये 
जून ते ऑगस्ट २०१९ या कालावधीतील महत्त्वाच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, पर्यावरण, विज्ञान व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घटना-घडामोडींची पायाभूत आणि त्यांचे परिणाम स्पष्ट करणारी विश्‍लेषणात्मक माहिती केंद्र व राज्य अर्थसंकल्प, तसेच आर्थिक पाहणी अहवाल, कलम ३७० आणि जम्मू-काश्‍मीर प्रश्न, आसामच्या राष्ट्रीय नागरिक नोंदणीची अंतिम यादी आणि स्थलांतरितांचा प्रश्न, भारताची चांद्रयान मोहीम-२, महाराष्ट्र राज्य महिला धोरणाची २५ वर्षे, जी २०- शिखर परिषद, व्याघ्रगणना, रॅमन मॅगसेसे तसेच साहित्य अकादमी पुरस्कार या व इतर विशेष चर्चेतील बातम्यांचा आढावा. विद्यार्थ्यांसाठी आकलन व वाचनसुलभ बुलेट पॉइंटस्वरूपातील लेखन यात आहे. चालू घडामोडींच्या विषयाच्या तयारीकरिता सराव प्रश्नसंचाचा व विशेष सामान्य ज्ञानाच्या माहितीचा (General Knowledge) पुस्तकात विशेष समावेश आहे. त्यामुळे केंद्र व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमधील पूर्व, मुख्य व मुलाखत अशा तीनही टप्प्यांवर उपयुक्त संदर्भपुस्तक आहे. बॅंकिंग, विमा, रेल्वे, पोलिसभरती, अशा  परीक्षांतील चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचे स्वरुप व  महत्त्व लक्षात घेऊन हे पुस्तक तयार केले आहे.

येथे उपलब्ध
सर्वच स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या या त्रैमासिकाचे मूल्य १०० रुपये असून, हे त्रैमासिक महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे व ‘सकाळ’च्या सर्व आवृत्ती कार्यालयात सवलतीत उपलब्ध आहे. सकाळ प्रकाशनाची पुस्तके ऑनलाइन खरेदी करण्यासाठी sakalpublications.com /www.amazon.in / bookganga.com येथे लॉगइन करावे. अधिक माहितीसाठी संपर्क- सकाळ मीडिया प्रा. लि. ५९५, बुधवार पेठ, पुणे - २. 
फोन : ०२० - २४४०५६७८ / ८८८८८४९०५०.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com