‘सकाळ करंट अपडेट्‌स’चे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी नुकतेच ‘सकाळ प्रकाशन’तर्फे ‘सकाळ करंट अपडेट्‌स व्हॉल्युम १’ हे त्रैमासिक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

चालू वर्षातील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या घटनांपैकी काँग्रेस पक्षाध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड, कमल हसन यांचा नवा राजकीय पक्ष, आम आदमी पक्षाच्या २० आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय, केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल व केंद्रीय अर्थसंकल्प, मॅग्नेटिक महाराष्ट्र योजनेची सुरवात, राज्यात अनाथ मुलांना एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय, स्वतःचे १०० उपग्रह पाठविण्याचा इस्रोचा विक्रम, पद्म पुरस्कार, अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू अशा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी, पर्यावरण, विज्ञान व आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घटना घडामोडींची माहिती, या घडामोडींचा इतिहास, घटनाक्रम तसेच महत्त्वाच्या संज्ञा-संकल्पना, या घडामोडींशी निगडित संस्थांची तशीच विशेष व्यक्तींची माहिती या त्रैमासिकामध्ये संकलित स्वरूपात देण्यात आली आहे.स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त सराव प्रश्नसंचाचा समावेश असलेल्या या त्रैमासिकाचे मूल्य १४० रुपये असून, हे त्रैमासिक महाराष्ट्रामधील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे व ‘सकाळ’च्या सर्व आवृत्ती कार्यालयात सवलतीत उपलब्ध आहे.

 अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी संपर्क - ०२० - २४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५० (सकाळी १० ते सायंकाळी ६)
 सकाळ प्रकाशनाच्या पुस्तकांच्या ऑनलाइन खरेदीसाठी लॉगइन करा - www.sakalpblications.com / amazon.in किंवा flipcart.com

Web Title: sakal current updates publication