बारामतीत शनिवारपासून "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

बारामती - सकाळ माध्यम समूहाने येत्या शनिवारी (ता. 2) व रविवारी (ता. 3) विद्यार्थ्यांसाठी "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो' या शैक्षणिक संधींविषयी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्याने उपलब्ध होत असलेल्या विविध संधींविषयी नामांकित तज्ज्ञ माहिती देणार आहेत. 

बारामती - सकाळ माध्यम समूहाने येत्या शनिवारी (ता. 2) व रविवारी (ता. 3) विद्यार्थ्यांसाठी "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो' या शैक्षणिक संधींविषयी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्याने उपलब्ध होत असलेल्या विविध संधींविषयी नामांकित तज्ज्ञ माहिती देणार आहेत. 

इंदापूरचे एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून, एक्‍सीड ऍकॅडमी बारामती हे सहप्रायोजक आहेत. बारामतीतील चिराग गार्डन येथे हे शैक्षणिक प्रदर्शन होणार असून, या दोन दिवसांत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहील. या प्रदर्शनात पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था सहभागी असून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व पालकांना या भागातील विविध शैक्षणिक संस्थांमधील उपलब्ध अभ्यासक्रम (इंजिनिअरिंग, पॉलिटेक्‍निक, मेडिकल, फार्मसी, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, आयटी, आर्टस, कॉमर्स, सायन्स), त्यांची प्रवेशप्रक्रिया, आवश्‍यक पात्रता, भविष्यातील रोजगाराच्या वाटा आदी सर्व विषयांबाबत माहिती मिळेल. 

या प्रदर्शनात शिवनगर विद्या प्रसारक मंडळ माळेगाव, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर, प्रॅक्‍टिकल बी.कॉम. वुईथ जीएसटी पुणे, फडतरे नॉलेज सिटी कळंब (वालचंदनगर), दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स भिगवण, तिरंगा कॉलेज ऑफ ऍनिमेशन ऍण्ड व्हीएफएक्‍स बारामती, झील एज्युकेशन पुणे या संस्थांसह इतरही संस्था सहभागी आहेत. 

या प्रदर्शनात सहभागी कोचिंग क्‍लासेस हे जेईई आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांबाबत माहिती देणार आहेत. सकाळ व प्रदर्शनातील सहभागी शिक्षण संस्थांतर्फे शनिवारी (ता. 2) व रविवारी (ता. 3) करिअरच्या विविध संधींविषयी विविध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या प्रदर्शनात दहावीनंतरचे करिअर, विविध प्रवेशप्रक्रिया, बदलती शैक्षणिक धोरणे, स्पर्धा परीक्षांची तयारी, यांचीही माहिती देणारी व्याख्याने होतील. हे व्याख्यान सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. 

शनिवारी (ता. 2) होणारी व्याख्याने 
1. दुपारी 3.30 वाजता - दत्ता सांगोलकर (सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)- विषय - स्पर्धा परीक्षांमधील करिअरच्या नव्या संधी. 
2. संध्याकाळी 4.30 वाजता - हेमचंद्र शिंदे (संचालक, सेंटर फॉर करिअर गाइडन्स) - विषय - प्रवेशप्रक्रिया व त्यातील बारकावे. 

रविवार (ता. 3) होणारी व्याख्याने 
1. सकाळी 10 वाजता - डॉ. प्रवीण नेमाडे (प्राचार्य, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, इंदापूर) - विषय - उच्च शिक्षण- काल, आज आणि उद्या. 
2. सकाळी 10.45 वाजता - प्रा. विठ्ठल जगताप (ट्रेनिंग ऍण्ड प्लेसमेंट ऑफिसर, एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट, इंदापूर)- विषय - उच्च शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी. 
3. सकाळी 11.30 वाजता - प्रा. आशिष दुबे (बी.टेक, एम.टेक, आयआयटी मुंबई) - विषय - दहावीनंतर सायन्समधील करिअरच्या उज्ज्वल संधी. 
4. दुपारी 12 वाजता - प्रा. दिनेश जाधव (प्रकल्प संचालक, शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर)- विषय - कौशल्य विकास आणि करिअरच्या संधी) 

अधिक माहितीसाठी संपर्क - संजय घोरपडे - 9922909064, घनश्‍याम केळकर- 9881098138) 

Web Title: Sakal Education Expo from Baramati on Saturday