'एज्युकेशन एक्‍स्पो'ला बारामतीत प्रतिसाद

 बारामती ः चिराग गार्डन येथे सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'चे उद्‌घाटन करताना (मध्यभागी) डॉ. गिरीश देसाई. (डावीकडून) डॉ. नीलकंठ ढोणे, प्रा. आशिष दुबे, डॉ. जयश्री सुरवसे, डॉ. देसाई, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास झोळ, तुषार रंजनकर आदी.
बारामती ः चिराग गार्डन येथे सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'चे उद्‌घाटन करताना (मध्यभागी) डॉ. गिरीश देसाई. (डावीकडून) डॉ. नीलकंठ ढोणे, प्रा. आशिष दुबे, डॉ. जयश्री सुरवसे, डॉ. देसाई, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास झोळ, तुषार रंजनकर आदी.

बारामती : येथील चिराग गार्डनमध्ये आज सकाळी सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'ला बारामती, इंदापूर, दौड, पुरंदर, फलटण, करमाळा, कर्जत आदी तालुक्‍यांतील विद्यार्थी व पालकांनी आज (शनिवार) गर्दी केली.

गर्दीच्या प्रतिसादात सुरू झालेल्या "सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो'चे आज दिमाखात उद्‌घाटन झाले. आज येथील प्रत्येक संस्थेच्या दालनासमोर विद्यार्थी व पालकांची गर्दी पाहायला मिळाली. आज सकाळी अकरा वाजता पिंपरी एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी एक्‍स्पोचे उद्‌घाटन केले. या वेळी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, किशोर मालोकर, एक्‍सीड ऍकॅडमीचे प्रा. आशिष दुबे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री सुरवसे, तिरंगा ऍनिमेशन कॉलेज ऍण्ड व्हीएफएक्‍स या संस्थेचे प्रमुख व प्रदर्शनाचे सहप्रायोजक रणजित शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास झोळ, ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. आशिष रासकर, प्रा. सागर शिंदे, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. नीलकंठ ढोणे, चैतन्य ऍकॅडमीचे अमर काळे, झील एज्युकेशन सोसायटीचे उद्धव सिद, प्रॅक्‍टिकल बीकॉमचे सन्मित शहा, सोमेश्वर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य श्री. गावडे, "सकाळ'च्या मुख्य उपसंपादक नयना निर्गुण, जाहिरात व्यवस्थापक मकरंद पावनगडकर आदी उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एक्‍सीड ज्युनिअर कॉलेज अँड ऍकॅडमी बारामती हे असून, तिरंगा कॉलेज ऑफ ऍनिमेशन ऍण्ड व्हीएफएक्‍स, बारामती हे या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. गिरीश देसाई म्हणाले, ""या शैक्षणिक प्रदर्शनामुळे निमशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचे काम सोपे झाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिक्षणाच्या अधिकाधिक चांगल्या संधी व पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाच्या संधी असलेल्या संस्था एकत्र आल्या. त्यांच्या माध्यमातून अभ्यासक्रमाच्या निवडायच्या शाखांची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. "सकाळ'ने गेल्या तीन वर्षांपासून सुरू केलेल्या या उपक्रमाचे रूपांतर आता मोठ्या स्वरूपात दिसू लागले आहे, हे कौतुकास्पद आहे. हा बदल ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांनी स्वीकारला आहे, हेच प्रचित होते.''

रविवारपर्यंत प्रदर्शन सुरू
रविवारपर्यंत (ता. 16) हे प्रदर्शन सुरू सुरू राहणार आहे. रविवारीही या शैक्षणिक प्रदर्शनात करिअरविषयक माहिती देणारी एकाहून एक सरस अशी व्याख्याने होणार आहेत. प्रदर्शनात सहभागी झालेल्या शैक्षणिक संस्थांमधील उपलब्ध अभ्यासक्रमाच्या शाखा, त्यांचे महत्त्व, प्रवेशाच्या संधी यांचीही माहिती तेथेच मिळून पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाचीही प्रक्रिया तेथे जाणून घेता येईल. यामध्ये विज्ञान शाखेपासून ऍनिमेशन, फॅशनपर्यंत व सीएपासून कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षेपर्यंत बरीच माहिती विद्यार्थी व पालकांना मिळेल. या एक्‍स्पोमधील प्रवेश विनामूल्य असून, तो सर्वांसाठी खुला आहे.

आज असतील हे तज्ज्ञ
रविवारी प्रसिद्ध तज्ज्ञ विवेक वेलणकर, प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांच्यासह अनेक तज्ज्ञांची व्याख्याने होतील. ही व्याख्याने चिराग गार्डन येथेच स्वतंत्र ठिकाणी होतील.
1) सकाळी दहा वाजता- एसपीसीटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. जयश्री सुरवसे या दहावी, बारावीसोबत स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयावर मार्गदर्शन करतील.
2) सकाळी साडेदहा वाजता- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर हे कौशल्य विकास व करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करतील.
3) सकाळी साडेअकरा वाजता- फॅशन डिझाइन तज्ज्ञ केतकी ताटे या फॅशन डिझाइनमधील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करतील.
4) बारा वाजता- प्रसिद्ध प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे हे प्रवेशप्रक्रिया व त्यातील बारकावे यांची माहिती देतील.
5) दुपारी एक वाजता- करिअर समुपदेशक विवेक वेलणकर हे दहावीनंतरच्या शाखांची निवड या विषयावर मार्गदर्शन करतील.

स्थळ- चिराग गार्डन, भिगवण रोड बारामती.
तारीख- 15 व 16 जून 2019
वेळ- सकाळी दहा ते रात्री आठ
प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य

चांगल्या प्रश्नांवर अमूल्य भेट
या प्रदर्शनातील सेमिनारमध्ये होणाऱ्या व्याख्यानादरम्यान व्याख्यात्यांशी संवाद साधून उत्तम प्रश्न विचारणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्रावरील उद्‌बोधक पुस्तक "माझी डायरी' हे भेट दिले जाणार आहे. या खेरीज प्रदर्शनास भेट देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास करिअरची संपूर्ण माहिती असलेला एक विशेषांकही भेट दिला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com