बारामतीत आजपासून सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो

Sakal education expo
Sakal education expo

बारामती: येथील चिराग गार्डन येथे आज (शनिवार) सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो हे शैक्षणिक प्रदर्शन सुरू झाले आहे. पालक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेले हे प्रदर्शन दोन दिवस सुरू राहणार आहे.

पिंपरी एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी दहा वाजता या प्रदर्शनाची सुरवात झाली. या वेळी विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविवारपर्यंत सुरू राहणार असलेल्या या शैक्षणिक प्रदर्शनात करिअरविषयक माहिती देणारी एकाहून एक सरस अशी व्याख्याने होणार आहेत. प्रदर्शनात सहभागी झालेल्या शैक्षणिक संस्थांमधील उपलब्ध अभ्यासक्रमाच्या शाखा, त्यांचे महत्त्व, प्रवेशाच्या संधी, प्रवेशाचीही प्रक्रिया यांचीही माहिती तेथेच मिळून पालक व विद्यार्थ्यांना जाणून घेता येईल. यामध्ये विज्ञान शाखेपासून ऍनिमेशन, फॅशनपर्यंत व सीएपासून कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षेपर्यंत बरीच माहिती विद्यार्थी व पालकांना मिळेल.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एक्‍सीड ज्युनियर कॉलेज अँड ऍकॅडमी बारामती हे असून, तिरंगा कॉलेज ऑफ ऍनिमेशन ऍण्ड व्हीएफएक्‍स बारामती हे या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. या एक्‍स्पोमधील प्रवेश विनामूल्य असून, तो सर्वांसाठी खुला आहे. इयत्ता सातवी ते दहावी, इयत्ता अकरावी ते बारावी तसेच पदवीधर आणि अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनाही आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने हा शैक्षणिक एक्‍स्पो लाभदायक ठरणार आहे. शिक्षणातील योग्य दिशा, योग्य वाटा निवडीसाठी पालक व विद्यार्थ्यांनो, हा दिवस नक्की राखून ठेवा.

शनिवारी चुकवू नये अशी व्याख्याने!
(व्याख्याने चिराग गार्डन येथेच स्वतंत्र ठिकाणी होतील)
1) सकाळी साडेअकरा वाजता रणजित शिंदे हे "ऍनिमेशन क्षेत्रातील करियरच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन करतील.
2) दुपारी सव्वाबारा वाजता आयआयटीयन्स प्रा. आशिष दुबे हे "दहावीनंतर विज्ञान शाखेतील करियरच्या संधी' या विषयावर मार्गदर्शन करतील.
3) दुपारी एक वाजता पिंपरी एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई हे "करिअर कसं करावं' या विषयावर मार्गदर्शन करतील.
4) दुपारी दीड वाजता पुण्यातील प्रसिद्ध कर सल्लागार मानसी रानडे या "सीए, सीएस, आयसीडब्ल्यूएची तयारी कशी करावी व त्यामधील संधी' या विषयावर मार्गदर्शन करतील.

स्थळ : चिराग गार्डन, भिगवण रोड, बारामती.
तारीख : 15 व 16 जून 2019
वेळ : सकाळी दहा ते रात्री आठ
प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य.

चांगले प्रश्न विचारा, अमूल्य भेट मिळवा
या प्रदर्शनातील सेमिनारमध्ये होणाऱ्या व्याख्यानादरम्यान व्याखात्यांशी संवाद साधून उत्तम प्रश्न विचारणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम यांचे जीवनचरित्रावरील "माझी डायरी' हे पुस्तक भेट दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com