Sakal-Excellence-Award
Sakal-Excellence-Award

कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ’तर्फे उद्या सन्मान

पुणे - जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग-व्यवसायात यशाच्या शिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरातील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे केला जाणार आहे. ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ देऊन रविवारी (ता. १) त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, पुणे पोलिस दलाचे सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

नामांकित वकील, प्रयोगशील शेतकरी शिक्षणतज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, वास्तुशास्त्राचे अभ्यासक, वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, डॉक्‍टर अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com