उद्यापासून करा मनसोक्त खरेदी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

 सकाळ फर्निचर आणि कंझ्युमर एक्‍स्पो २०१७ 
 ठिकाण ः पंडित फार्म, कर्वेनगर परिसर, पुणे
 दिनांक ः १८ ते २२ मे २०१७
 वेळ ः सकाळी ११ ते रात्री ९
 प्रवेश शुल्क ः रु. १० प्रत्येकी (सकाळ-मधुरांगण सभासदांना ओळखपत्र दाखवून विनामूल्य प्रवेश)
 वाहनतळाची सुविधा विनामूल्य

पुणे - पुणेकरांना मनसोक्त आणि वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद घेता यावा म्हणून ‘सकाळ’ने ‘सकाळ फर्निचर आणि कंझ्युमर एक्‍स्पो’ आयोजित केला आहे. कर्वेनगर परिसरातील पंडित फार्म्स येथे गुरुवारपासून (ता. १८) होणाऱ्या या पाच दिवसांच्या एक्‍स्पोमध्ये दोनशेहून अधिक स्टॉलवर दहा हजारांपेक्षा जास्त प्रकारच्या वस्तूंची रेलचेल असणार आहे. थेट उत्पादक आणि होलसेल विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. 

या प्रदर्शनात नागरिकांसाठी गृहोपयोगी वस्तूंपासून फर्निचर खरेदीचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. फर्निचरमध्ये डिझायनर सोफा सेट, मॉड्युलर किचन, डायनिंग सेट्‌स, बेडरूम पॅकेजेस, वॉर्डरोब्ज, 

ड्रेसिंग टेबलही ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी ज्वेलरी, कपडे, फूटवेअर आणि अनेक खाद्यपदार्थही एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. 

Web Title: Sakal Furniture and Consumer Expo 2017