गृहसजावट ते खाद्यपदार्थ... एकाच छताखाली

गृहसजावट ते खाद्यपदार्थ... एकाच छताखाली

पुणे - वैविध्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीची संधी देणाऱ्या ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो २०१८’ ला बुधवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फर्निचरपासून ते गॅजेट्‌सपर्यंत... गृहसजावटीच्या वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अशा विविध वस्तू एकाच छताखाली लोकांना खरेदी करता आल्या. लाइव्ह डेमोसह एक्‍स्चेंज ऑफर्स आणि विविध सवलतींचा लाभ लोकांना घेता आला. या एक्‍स्पोमध्ये किचन अप्लायन्सेसच्या जोडीला आपले घर सुंदर दिसावे, यासाठी डिझायनर फर्निचरचे विविध प्रकार पाहता येतील. येत्या चार दिवसांत एक्‍स्पोत वस्तूंच्या खरेदीसाठी खास सवलतीही दिल्या आहेत.

एक्‍स्पोमध्ये सागवानी लाकूड ते लोखंडापासून तयार केलेले फर्निचर खरेदी करता येईल. फर्निचरमध्ये झोपाळा, डायनिंग सेट्‌स, सोफा कम बेड, बेडरूम सेट, दिवाण सेट, मिनी सीटिंग सेट, सोफा सेट्‌स, वॉडरोब्ज, अँटिक फर्निचर असे विविध प्रकार पाहायला मिळतील. सोफा सेटपासून ते बेडरूम सेटपर्यंतचे प्रकार सागवानी लाकडापासून तयार केले आहेत. फोल्डिंग सोफा विथ बेड, मॅट्रेसेस, बीन बॅग्ज, ऑफिस खुर्ची असे विविध प्रकारही खरेदीसाठी आहेत.

एक्‍स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे किचन अप्लायन्सेससह घराला एक नवे रूप देण्यासाठी डिझायनर फर्निचरचा समावेश केला आहे. फर्निचरसह आकर्षक पडदे, चादरी, कुशन्स, कार्पेट्‌सही आहेत. त्याचबरोबर गृहसजावटीच्या वेगवेगळ्या वस्तूही एक्‍स्पोत असून, विविध नामवंत कंपन्यांनी आपली उत्कृष्ट उत्पादने यात सादर केली आहेत. या एक्‍स्पोतील शंभरहून अधिक स्टॉल्सद्वारे लोकांना खरेदी करता येणार आहे. किचन अप्लायन्सेसमध्ये गॅस शेगड्यांपासून ते चिमणीज्‌पर्यंत आणि खवय्यांसाठी खास खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत. हा एक्‍स्पो रविवारपर्यंत (ता. २६) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पाहावयास खुला आहे. 

कालावधी - रविवारपर्यंत (ता. २६)
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ
स्थळ - गणेश कला क्रीडा 
मंच, स्वारगेट
सुविधा - प्रवेश विनामूल्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com