फर्निचर अन्‌ खाद्यपदार्थांची मेजवानी

Sakal-Furniture-Kitchen-Expo
Sakal-Furniture-Kitchen-Expo

पुणे - गृहसजावटीचे साहित्य, किचन फर्निचरसोबत कपडे, विविध विद्युत उपकरणे अशा गृहोपयोगी वस्तूंसह खाद्यपदार्थांच्या खरेदीची संधी ‘सकाळ फर्निचर व किचन एक्‍स्पो २०१८’मध्ये पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. गुरुवारी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती.

फर्निचरपासून ते गॅजेट्‌सपर्यंत... गृहसजावटीच्या वस्तूंपासून खाद्यपदार्थांपर्यंत विविध वस्तू एकाच छताखाली ग्राहकांना खरेदी करता आल्या. ‘लाइव्ह डेमो’सह एक्‍स्चेंज ऑफर्स आणि विविध सवलतींचा लाभ ग्राहकांना घेता आला. या एक्‍स्पोमध्ये सागवानी लाकूड ते लोखंडापासून तयार केलेले फर्निचर खरेदी करता येईल. झोपाळा, डायनिंग सेट्‌स, सोफा कम बेड, बेडरूम सेट, दिवाण सेट, मिनी सीटिंग सेट, सोफा सेट्‌स, वॉडरोब्ज, अँटिक फर्निचर असे विविध प्रकार येथे पाहायला मिळतील. सोफा सेटपासून बेडरूम सेटपर्यंतचे प्रकार सागवानी लाकडापासून तयार केले आहेत. फोल्डिंग सोफा विथ बेड, मॅट्रेसेस, बीन बॅग्ज, ऑफिस खुर्ची असे विविध प्रकारही खरेदीसाठी उपलब्ध आहेत. 

घराला नवे रूप देण्यासाठी डिझायनर फर्निचरचा समावेश केला आहे. त्यात आकर्षक पडदे, चादरी, कुशन्स, कार्पेट्‌सही आहेत. शंभरहून अधिक स्टॉल्सद्वारे ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. खवय्यांसाठी खास खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत. हा एक्‍स्पो रविवारपर्यंत (ता. २६) खुला आहे.

एक्‍स्पोविषयी...
    कालावधी - रविवारपर्यंत (ता. २६) 
    वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ 
    स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
    सुविधा - प्रवेश विनामूल्य 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com