किचन अप्लायन्सेसच्या खरेदीला ग्राहकांची गर्दी

स्वारगेट - गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित एक्‍स्पोमध्ये किचन अप्लायन्सेसची खरेदी करताना ग्राहक.
स्वारगेट - गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित एक्‍स्पोमध्ये किचन अप्लायन्सेसची खरेदी करताना ग्राहक.

पुणे - स्वयंपाकगृहाला परिपूर्ण करणाऱ्या ‘किचन अप्लायन्सेस’च्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पो’ला दुसऱ्या दिवशीही ग्राहकांनी गर्दी केली होती. 

एक्‍स्पोमध्ये मॉड्युलर किचन, चिमणी, गॅस शेगड्या, तंदूर, आटा चक्की, वेट ग्राइंडर, स्टीम कुकर असे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे. फेबर कंपनीचे विक्रेते अनिल लोंढे म्हणाले, ‘‘रोजच्याच वापराचे किचन साहित्याच्या खरेदीला ग्राहक नेहमी पसंती देतात. स्वयंपाकगृहाला परिपूर्णता देणारे सर्व साहित्य योग्यदरात एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचा खरेदीचा ओघ वाढलेला दिसतो.’’ खरेदीला आलेल्या स्मिता गायकवाड म्हणाल्या, ‘पिठाची गिरणी आजकाल स्वयंपाक गृहाची आवश्‍यकता बनली आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची आणि खिशाला परवडेल अशा भावात खरेदी करण्यासाठी मी एक्‍स्पोला आली आहे.’’ विविध साहित्याची १२० दालने असलेला हा एक्‍स्पो सोमवार (ता. १६) पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे. येथे पार्किंग व मोफत प्रवेशाची सुविधा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com