गृहोपयोगी साहित्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

स्वारगेट - गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पोमध्ये खरेदी करताना नागरिक.
स्वारगेट - गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पोमध्ये खरेदी करताना नागरिक.

‘सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पो’ला सुरुवात; १२० दालने एकाच छताखाली
पुणे - घराला घरपण देणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी पहिल्याच दिवशी ग्राहकांनी ‘सकाळ फर्निचर आणि किचन एक्‍स्पो’ला गर्दी केलेली दिसली. स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित एक्‍स्पोला गुरुवारी सुरुवात झाली. सोमवारपर्यंत (ता. १६) चालणाऱ्या या एक्‍स्पोमध्ये फर्निचर, किचन, बेडरुम सेट, डायनिंग सेट आदी गृहोपयोगी साहित्याची १२० दालने एकाच छताखाली मांडण्यात आली आहेत. नामवंत कंपन्यांचे योग्य दरामध्ये साहित्य उपलब्ध असल्याने ग्राहकांनी खरेदीला पसंती दिल्याचे दिसले. 

फर्निचरमध्ये पिकनिक टेबल, सोफा सेट, शिशम वूड फर्निचर, गार्डन फर्निचर, वॉर ड्रॉप, कार्विंग फर्निचर, अँटिक फर्निचर आदींची दालने मांडण्यात आली आहेत. फर्निचर विक्रेता शेहबाज अन्सारी म्हणाले, ‘‘पहिल्याच दिवशी आम्हाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्याकडे उपलब्ध सोफा सेट ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून, आम्हालाही ४० वेगवेगळ्या प्रकारातील सोफा सेट ग्राहकांना एकाच दालनात उपलब्ध करून देता आले आहेत.’’

आधुनिक प्रकारातील फर्निचरबरोबरच पारंपरिकता जोपासणारे अँटिक फर्निचरही येथे उपलब्ध आहे. बाजारात मिळणाऱ्या भावापेक्षा माफक दरात फर्निचर येथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. खरेदीसाठी आलेल्या गीता सरोदे म्हणाल्या, ‘‘घरासाठी आवश्‍यक सर्व वस्तू एकाच ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच किमतीही योग्य असल्यामुळे मी इथे खरेदीला प्राधान्य दिले. घरामध्ये शोभेल असे फर्निचर आणि इतर आवश्‍यक गोष्टी इथे एकाच वेळी खरेदी करता येतात.’’

फर्निचरबरोबरच किचनचे साहित्य, फूड प्रॉडक्‍ट, होम नॉव्हेल्टीज, गारमेंट्‌स आदी येथे खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com