कपडे, गॉगल्स अन्‌ इमिटेशन ज्वेलरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पुणे - गृहोपयोगी वस्तूंपासून ते डिझायनर फर्निचरपर्यंत अशा विविध वस्तूंच्या खरेदीची संधी देणाऱ्या ‘सकाळ फर्निचर अँड कंझ्युमर एक्‍स्पो’ला शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये महिला-तरुणींनी दागिने आणि कपड्यांच्या खरेदीवर भर दिला. तर गॉगल्स, परफ्युम, फूटवेअर आणि डिझायनर कपड्यांच्या खरेदीसाठी पुरुषांनी गर्दी केली होती. इमिटेशन ज्वेलरीबरोबर खडे आणि मोत्यांचे दागिने खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तर दागिन्यांसह टी-शर्ट, जीन्स, कुर्ता आणि साड्यांमधील अनेक प्रकार पाहता येतील. रविवारी (ता. २१) सुटीचा दिवस असल्याने या एक्‍स्पोत खास सवलती ठेवल्या आहेत. 

या एक्‍स्पोत फर्निचरबरोबरच गृहसजावटी आणि गृहोपयोगी वस्तूंच्या असंख्य व्हरायटी पाहायला मिळत आहेत. कांजीवरम साड्यांपासून ते डिझायनर कुर्ते खरेदी करता येतील. प्रिंटेड टी-शर्ट, कॅलिग्राफी केलेले टी-शर्ट यासह जिन्स, टॉप, प्लाझो असे कपड्यांचे विविध प्रकारही उपलब्ध आहेत. फूटवेअर आणि सौंदर्यप्रसाधनांमधील व्हरायटीही महिला-तरुणींच्या पसंतीस उतरेल. पुरुषांसाठी प्रिंटेड टी-शर्ट, जिन्स, कुर्ते यासह फुटवेअरमध्येही असंख्य प्रकार आहेत. तर लहान मुलांसाठी कपडे, शैक्षणिक साहित्य, सीडीज आणि मनोरंजक खेळ खरेदीसाठी आहेत. आकर्षक दागिन्यांची रेंजही येथे आहे. दोनशेहून अधिक स्टॉल्स आणि दहा हजारांहून अधिक उत्पादने एकाच छताखाली पुणेकरांना पाहता येणार आहेत. या एक्‍स्पोत ऑटोमोबाईल कंपन्यांनीही सहभाग घेतला आहे. त्यांच्या डिझायनर कार्सचे मॉडेल्सही येथे पाहता येतील.

सकाळ फर्निचर अँड कंझ्युमर एक्‍स्पो
कालावधी - सोमवार (ता. २२) पर्यंत.
स्थळ - पंडित फार्म्स, कर्वेनगर परिसर
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ
प्रवेश शुल्क - प्रत्येक १० रुपये (सकाळ मधुरांगण सभासदांना ओळखपत्र दाखवून विनामूल्य प्रवेश.)
सुविधा - वाहनतळ मोफत

Web Title: sakal furniture & consumer expo