सकाळ हॉलिडे कार्निव्हल रंगणार

Sakal-Holiday-Carnival
Sakal-Holiday-Carnival

पुणे - पर्यटन म्हणजे फिरणे, फोटोग्राफी आणि खाण्याचा आस्वाद घेणे. जगभरातील भ्रमंतीच्या पर्यायांची माहिती घेणे. पर्यटकांच्या मनात येते काय काय बघायला मिळेल? फोटोग्राफर्स विचार करतो कॅमेऱ्यात काय कैद करता येईल? तर फूड ब्लॉगर्स, खवय्यांच्या मनात येते, काय स्पेशल खायला मिळणार? या तीनही गोष्टींना एकाच व्यासपीठावर आणणारे ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ २४ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार आहे.

‘सकाळ ट्रॅव्हल एक्‍स्पो’च्या यशानंतर आता हे आणखी मोठे व्यासपीठ ‘सकाळ’ने पर्यटनप्रेमींसाठी आणले आहे. फिरण्याची ठिकाणे हा समस्त पर्यटनप्रेमींचा जिव्हाळ्याचा विषय. फिरायला कुठे जायचे? कसे जायचे? उत्कृष्ट ठिकाणे कोणती? या पर्यटनप्रेमींच्या मनातील सर्वच प्रश्‍नांची उत्तरे देणारे हे कार्निव्हल आहे. यामध्ये जशा ट्रॅव्हल्स कंपन्या आहेत तसेच फूड स्टॉल्सही आहेत. फोटोग्राफर्सना सुवर्णसंधी देणारी फोटोग्राफी स्पर्धाही येथे असणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यावसायिकांना अशी सर्व लोकांना एकत्र करणाऱ्या कार्निव्हलमध्ये सहभागी होण्याची संधी आहे; जी त्यांच्या व्यवसायाचे यश द्विगुणित करेल. तेव्हा आपण जर ट्रॅव्हल व फूड व्यावसायिक असाल, तर या कार्निव्हलमध्ये नक्कीच सहभागी व्हा. आपला स्टॉल आजच बुकिंग करा.

स्टॉल बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क -
प्रसन्न देवी - ९८५०९९२२८९
प्रवीण घोगरे - ७३८७७१०४०४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com