उन्हाळ्याच्या सुटीतील डेस्टिनेशन करा निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

छायाचित्र स्पर्धेतील विजेते -

  • सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द ईयर २०२० विजेता : सुदर्शन वंदकर
  • लॅंडस्केप कॅटेगरी : राहुल देशमुख
  • डस्क टु डॉन कॅटेगरी : राहुल धर्माजी बुलबुले
  • स्ट्रक्‍चर्स कॅटेगरी : प्रतीक वाडेकर
  • स्ट्रीट्‌स अँड पीपल कॅटेगरी : मुकुंद सुधीर पारखे

तुम्ही ठरणार ‘लकी’?
ट्रॅव्हलर कंपनीतर्फे दर दोन तासांनी ‘लकी ड्रॉ’ आयोजित केला आहे. त्यातून पर्यटकांना बक्षीस जिंकण्याची संधी आहे. या कार्निव्हलच्या पहिल्या दिवशी आशिष शिंदे (रा. पिंपळे गुरव) आणि अच्युत जोशी (रा. सिंहगड रस्ता, अनुबंध सोसायटी) यांना डोमेस्टिक डेस्टिनेशनचे एका बाजूच्या विमान प्रवासाची तिकिटे ‘लकी ड्रॉ’तून मिळाली.

पुणे - उत्तुंग हिमशिखरे, खळखळून वाहणाऱ्या नद्या, मनाला भुरळ घालणारी सदाहरित जंगले तुम्हाला साद घालत आहेत. निसर्गसौंदर्याने नटलेला ईशान्य भारत तुम्हाला खुणावतो आहे. पर्यटनाचे असे असंख्य पर्याय घेऊन तुमच्याकडे आलेल्या ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ची शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. हा कार्निव्हल तुमच्यापुढे देश-विदेशांतील पर्यटनाचे एक-एक मार्ग खुला करेल. त्यामुळे या कार्निव्हलला भेट देऊन तुम्ही ठरवा तुम्हाला या सुटीत कुठे फिरायला जायचंय!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘सकाळ’तर्फे हा ‘हॉलिडे कार्निव्हल’ कर्वेनगर येथील राजा मंत्री मार्गावरील (डीपी रस्ता) पंडित फार्म येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्निव्हलचे उद्‌घाटन ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाले. कार्निव्हल पॉवर्ड बाय गिरिकंद ट्रॅव्हल्स असून, त्याचे सहप्रायोजक ‘एमएफडब्ल्यू ट्रॅव्हल्स’ आहेत. या कार्निव्हलला ‘ट्रॅव्हलर’चे संदीप देसाई, ‘टॅप’ (ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन, पुणे) आणि ट्रॅव्हलर्सचे विजय लोखंडे, शशांक कुलकर्णी, नीलेश भन्साळी यांनी सहकार्य केले. उद्‌घाटनप्रसंगी ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव उपस्थित होते. 

पानिपत पराभवाचा नाहीतर शौर्याचा इतिहास : गोवारीकर

कार्निव्हल रविवारपर्यंत (ता. २६) आहे. यातील सर्व दालने सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत यातील पर्यटकांसाठी खुली राहतील. त्यातून तुम्हाला तुमचे ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ निश्‍चित करता येईल. बुकिंग करता येईल; तसेच त्यावर भरघोस सवलतही मिळविता येणार आहे. 

फोन टॉपिंग म्हणजे मुलभूत तत्वांवर घाला घालण्याचे काम : थोरात
 
‘क्‍लिक’शी जोडा तुमचे नाते
पर्यटन आणि कॅमेरा यांचे अतूट नाते जडले गेले आहे. पर्यटनातील प्रत्येक स्मृती साठवत असतानाच त्यातील काही क्षण कॅमेऱ्यात आपोआप कैद होतात. त्या ‘क्‍लिक’ला आयुष्यभराची साथ मिळते. अशाच आयुष्यभर साथ मिळालेल्या ‘क्‍लिक्‍स’ तुम्हाला कार्निव्हलमध्ये पाहता येणार आहेत. त्यापैकी काही ‘क्‍लिक’ अशा असतील की, तुम्हाला तुमच्या ट्रिपची आठवण करून देतील; तर काही ‘क्‍लिक्‍स’ तुमच्या मनात पर्यटनाच्या नवीन डेस्टिनेशनचे बीज रोवतील. या कार्निव्हलच्या निमित्ताने ‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर २०२०’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांनी काढलेल्या; तसेच काही निवडक सर्वोत्तम छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे स्वतंत्र दालन कार्निव्हलमध्ये सजविले आहे. या दालनात प्रत्येक पर्यटकप्रेमींना खिळवून ठेवते. हिमाच्छादित शिखरे, वाळवंटातील रेती, सूर्यास्त, समुद्र यांची संवादी छायाचित्र डोळ्यांत साठवावी अशीच आहेत. या स्पर्धेला परीक्षक म्हणून मिलिंद ढेरे, विशाल जाधव आणि संदीप देसाई या अनुभवी फोटोग्राफर्सचे योगदान लाभले.

आम्ही सुरुवातीपासूनच ‘सकाळ’च्या उपक्रमाशी जोडले गेलो आहोत. सुटीतील बुकिंगची सुरुवात या कार्निव्हलपासून होते. यातून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. काही टुर्स या माध्यमातून नव्याने सुरू होतात.
- अखिलेश जोशी, संचालक, गिरिकंद ट्रॅव्हल्स

एकाच छताखाली पर्यटनाचे वेगवेगळे पर्याय या कार्निव्हलच्या निमित्ताने ग्राहकांना मिळतात; तसेच पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनाही थेट पर्यटकांपर्यंत पोचण्याची संधी या व्यासपीठाच्या माध्यमातून उपलब्ध होते.
- प्रीती मोरे, व्यवस्थापकीय संचालक, ‘एमडब्ल्यूएफ ट्रॅव्हल्स’

महाराष्ट्रापासून ते परदेशापर्यंत प्रत्येक पर्यटनस्थळाची सविस्तर माहिती आणि त्याच्या बुकिंगचे वेगवेगळे पर्याय या कार्निव्हलमध्ये पर्यटकांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीतील पर्यटन पुणेकरांना यातून निश्‍चित करता येईल.
- मेधा कुलकर्णी, माजी आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal holiday carnival start today