‘मे फेस्ट’मध्ये बच्चेकंपनीचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

फॉर्म मिळण्याचे ठिकाण व वेळ
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड - सकाळी ११ ते २ 
क्‍लारा ग्लोबल स्कूल, घोरपडी - सकाळी ११ ते २ 
अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍स, सिंहगड रोड - सकाळी ११ ते ७ 
सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी - सकाळी ११ ते २ 

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद जल्लोषात साजरा करण्यासाठी ‘सकाळ’तर्फे अफलातून ‘मे फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बच्चेकंपनीला दोन दिवस विविध उपक्रमांची भन्नाट मेजवानीच मिळणार आहे. ४ आणि ५ मे रोजी हा फेस्टिव्हल होणार आहे.

मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुटी लागते आणि प्रत्येक पालकाला मुलांच्या सुटीच्या नियोजनाचे टेन्शन येते. पण, हे टेन्शन भुर्रकन दूर करणाऱ्या आणि सुटीची धमाल घडविणाऱ्या ‘मे फेस्ट’मधील सहभाग नक्कीच कल्पक ठरणार आहे. यामध्ये की होल्डर, ऑर्किड फ्लॉवर, सायन्स रिफ्लेक्‍शन, रॉकेट, स्ट्रॉ फोटोफ्रेम, पेन स्टॅंड असे वर्कशॉप राबविणार आहेत. प्रत्येक वर्कशॉपचे शुल्क वेगवेगळे असून, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य ‘सकाळ’तर्फे देण्यात येणार आहे. मुलांनी वर्कशॉपसाठी येताना फेविकॉल, जुने वर्तमानपत्र, कात्री, रुमाल, स्केच पेन, रंगीत खडू, पाण्याची बाटली व डबा आणायचा आहे. पालकांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे. या वर्कशॉपच्या सहभागाचे प्रमाणपत्रही देणार आहे.

४ ते १६ वयोगटातील मुला-मुलींना यामध्ये सहभाग घेता येणार असून, सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत तीन वेगवेगळ्या भागांमध्ये हे उपक्रम राबविले जाणार आहेत. जेथे वर्कशॉप होणार आहे तेथेच रजिस्ट्रेशन सुरू आहे. अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍स, मॅजिक वर्ल्ड इव्हेंट व एनलाइट किड्‌स हे ‘मे फेस्ट’चे प्रायोजक आहेत.

‘मे फेस्ट’ वर्कशॉप
तारीख - शनिवार (ता. ४) व रविवार (ता. ५) मे २०१९ 
वेळ - सकाळी १० ते सायंकाळी ६ 
अधिक माहितीसाठी संपर्क - ८८०५००९३९५, ९५५२५३३७१३
महत्त्वाचे - वर दिलेल्या ठिकाणांवर आजपासून फॉर्म मिळणार असून, वर्कशॉपही याच ठिकाणी ४ व ५ मे रोजी होतील.

Web Title: Sakal May Fest Child Entertainment