"सकाळ'मध्ये रंगला आनंदसोहळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जानेवारी 2017

पुणे - नववर्षाच्या जल्लोषमय स्वागतानंतर पुणेकरांची पावले वळत होती ती पुण्याचा आणि महाराष्ट्राचा आरसा असलेल्या "सकाळ'च्या वर्धापनदिन सोहळ्याकडे. आनंद द्विगुणित करणारा हा सोहळा. त्यामुळे सामान्य वाचकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन "सकाळ'ला भरभरून शुभेच्छा दिल्या अन्‌ एकमेकांतील नाते अधिक दृढ केले. त्यामुळे हा आनंदसोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. 

लोकजीवनाशी एकरूप झालेल्या "सकाळ'चा 85वा वर्धापन दिन "सकाळ'च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने नव्या-जुन्या पिढीतील वाचक एकत्र आले होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, साहित्य-संस्कृती, विज्ञान अशा समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील असंख्य वाचकांनी "सकाळ'ला शुभेच्छा दिल्या. "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, सौ. भारती पवार, संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, मुख्य संपादक श्रीराम पवार, संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. 

मान्यवरांबरोबरच सामान्य वाचकांसाठी अंथरलेले "रेड कार्पेट'... सनईचे मंजूळ स्वर... आकर्षक झुंबर... "एलईडी वॉल'वरून "सकाळ'ची उलगडणारी वाटचाल... राजकीय व्यक्तींमध्ये रंगलेली पालिकेच्या निवडणुकीवर चर्चा... नोटाबंदी विषयावरील चर्चेत गुंतलेले सामान्य वाचक... काळानुसार "सकाळ'ने बदल कसा स्वीकारला, हे अनुभव सांगणाऱ्या मित्रांच्या मैफली... एकमेकांना नववर्षाच्या दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा... तरुणाईकडून काढले जाणारे "सेल्फी' अशा उत्साहवर्धक वातावरणात हा सोहळा रंगला. 

Web Title: sakal-media-group-85th-anniversary

टॅग्स